PGCIL Apprentice Recruitment 2021नवी दिल्ली : पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 1110 पदांवर अप्रेंटिस भरती प्रकिया सुरु आहे. अधिकृत माहितीनुसार पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्ट साठी अर्ज मगावण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक उमेदवार powergrid.in वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.
कॉर्पोरेट सेंटर, गुरुग्राम: 44
उत्तर विभाग-1 फरीदाबाद: 134
उत्तर विभाग -2 जम्मू: 83
उत्तर विभाग-3 लखनऊ : 96
पूर्व विभाग-1 पाटणा: 82
पूर्व विभाग-2 कोलकाता : 74
उत्तर पूर्व विभाग शिलाँग: 127
ओडिशा प्रोजेक्टस, भुवनेश्वर : 53
पश्चिम विभाग -1 नागपूर : 112
पश्चिम विभाग -2 नागपूर : 115
पश्चिम विभाग -3 नागपूर : 76
पश्चिम विभाग -4 नागपूर : 114
ऑनलाईन अर्ज जमा करण्यास सुरुवात: 21 जुलै 2021
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अखेरची तारीख : 20 ऑगस्ट
आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिकल साठी उमदेवारांचा इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.
ग्रॅज्युएट अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएसी इंजिनिअरींग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्युटर सायन्स मध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.
HR एक्झ्युकेटीव्ह साठी मानव संसाधनातील एमबीए , एमएसडब्ल्यू , पर्सनल मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट दोन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे.
बॉर्डर सिक्युरीटी फोर्स म्हणजेच सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. BSF द्वारे जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदावर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बीएसएफमध्ये नॉन-गॅझेटेड आणि नॉन-मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) ग्रुप सी च्या पदांसाठी भरती करण्यात येत आहे. एकूण 269 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. स्पोर्टस कोट्यातून पात्र खेळाडूंसाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
बीएसएफ द्वारे एकूण 269 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे आणि या सर्व रिक्त जागा क्रीडा कोट्यासाठी घोषित करण्यात आल्या आहेत. बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भर्ती 2021 अधिसूचनेनुसार, बीएसएफ जीडी कॉन्स्टेबल रिक्रूटमेंट ग्रुप सी पदांची भरती कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं गरचेचं आहे.
इतर बातम्या:
BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती
आरोग्य विभागात 3 हजार 466 जागांवर बंपर भरती, अर्ज करा अन् मिळवा नोकरी
PGCIL Recruitment 2021 apprentice post on 1110 seat at various centres of India