पुणे महानगरपालिकेत बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Jan 11, 2024 | 11:42 AM

PMC Recruitment process : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेत मेगा भरती सुरू झालीये. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. जाणून घ्या या भरतीबद्दल.

पुणे महानगरपालिकेत बंपर भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Follow us on

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती लवकरच सुरू होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे बंपर भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेकडून राबवली जातंय. नोकरीचे ठिकाण हे पुणेच असणार आहे.

पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 113 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडून राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 113 पदांसाठी सुरू आहे. चला तर मग फटाफट करा अर्ज.

पुणे महापालिकेमध्ये 113 कनिष्ठ अभियंत्यांच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपण 16 जानेवारी 2024 पासून अर्ज हे करू शकता. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची तारीख देखील जवळ आलीये. इच्छुकांसाठी ही मोठी संधी आहे. लगेचच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावीत.

नुकताच पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती ही देण्यात आलीये. गेल्यावर्षी 135 कनिष्ठ अभियंत्यांची भरतीची प्रक्रिया महापालिकेने राबविली होती. त्यासाठी तीन वर्षांची अनुभवाची अट असताना देखील सुमारे 12 हजार 500 उमेदवारांनी अर्ज केले होते. यामुळेच या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे सांगितले जातंय.

या भरती प्रक्रियेच्या 113 जागांपैकी 13 जागा या माजी सैनिकांसाठी आरक्षित असणार आहे. उर्वरित 100 या सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अनुभवाची कोणत्याही प्रकारची अट ही ठेवण्यात आली नाहीये. यामुळे नुकताच अभियंत्याचे शिक्षण घेतलेले उमेदवार हे देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.