नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षेची अर्थात नीटची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नेहमीच त्यांच्या निकालाची चिंता सतावत असते. यावर्षी नीटची परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळेही बरेच विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास कसा होईल, निकाल काय लागेल, या चिंतेत असतील. पण चिंतेचे कारण नाही. खाली दिलेल्या टिप्स फॉलो करून परीक्षेचे आणि निकालाचे टेन्शन दूर पळवा. (Prepare for the exam properly with less stress; Follow these tips)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) आयोजित या परीक्षेत (नीट परीक्षा 2021) दरवर्षी अनेक विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे या परिक्षेत सध्या स्पर्धा खूपच वाढली आहे. एनटीएकडून यंदा या परीक्षेत अनेक बदल करण्यात आले आहेत. यंदा जेईईप्रमाणेच नीटमध्ये अंतर्गत पर्याय सुरू करण्यात आले आहेत. प्रश्न नमुन्यानुसार, नीट 2021 मध्ये समाविष्ट भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांचे दोन विभाग असतील. एक म्हणजे ए आणि दुसरा बी. पहिल्या विभागात 35 अनिवार्य प्रश्न असतील तर दुसऱ्या विभागात 15 प्रश्न असतील, त्यापैकी विद्यार्थ्यांना कोणत्याही 10 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. या परीक्षेची भीती दूर करण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी आम्ही काही टिप्स येथे देत आहोत. या टिप्स परीक्षा देण्यासाठी तयार असलेल्या उमेदवारांसाठी खूप उपयुक्त ठरतील.
प्रत्येक उमेदवाराला परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी वेगळा विचार करावा लागेल. परीक्षेसाठी उमेदवारांनी त्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक बनवावे. सुरुवातीला अभ्यासक्रमाचे विश्लेषण करा, आपली ताकद तसेच उणिवा समजून घ्या आणि त्यानुसार वेळापत्रक तयार करा.
अनेक विद्यार्थी त्यांचा ज्या विषयामध्ये अधिक रस असतो, त्या विषयाचा अधिक अभ्यास करतात. मुळात आपले संपूर्ण लक्ष केवळ एका विषयावर केंद्रित करणे हा चुकीचा मार्ग आहे. असे केल्यामुळे तुमच्या अभ्यास करण्याच्या वेळापत्रकात काही विषय मागेच राहून जातात. तुम्ही ते विषय रिव्हाइज करू शकत नाहीत. म्हणून अभ्यासामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी दररोजच्य वेळापत्रकामध्ये सर्व विषयांना काही तास देणे उचित आहे.
लर्न-प्रॅक्टिस-टेस्ट अर्थात शिका-सराव करा आणि चाचणीचा नियम पाळा. नीटसारख्या मोठ्या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. बरेच विद्यार्थी यापैकी काही पायऱ्या वगळतात आणि ताण वाढवून घेतात. सराव करताना वेग आणि अचूकता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या शिकण्याच्या प्रक्रियेत नेहमी वेग आणा. यासाठी तुम्ही मागील काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांची मदत घेऊ शकता.
परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक नोट्स बनवण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी तुम्ही रोज काय वाचता ते लक्षात ठेवा. यामुळे तुमची चांगली तयारी होईल. तसेच तुम्हाला परीक्षेपूर्वी रिव्हीजनसाठी चांगले अभ्यास साहित्यदेखील मिळेल.
अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिवस -रात्र अभ्यास करतात. पुरेशी झोपही घेत नाही. मात्र त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अभ्यास केलेल्या गोष्टीही विसरण्यास सुरुवात होते. त्यामुळे परीक्षेच्या काळात आपले शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी किमान 6 ते 7 तासांची चांगली झोप घ्या. तसेच 1 ते 2 तासांच्या अभ्यासादरम्यान किमान 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. ब्रेकदरम्यान आपले शरीर आणि हात ताणून घ्या. तसेच पुरेसे पाणी घ्या. या टिप्स फॉलो करून तुम्ही परीक्षेसाठी अधिक चांगली तयारी करू शकता. (Prepare for the exam properly with less stress; Follow these tips)
मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासाhttps://t.co/A9ZDDTQh45#MarutiSwift |#Desire |#CNGModels |#Features
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
इतर बातम्या
आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही; ‘त्या’ लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?