मुंबई : पुणे महानगरपालिकेकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेतून 77 पदे भरली जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याकरिता राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची उमेदवारांची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. फक्त थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. तब्बल 77 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने पदानुसार शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. यामध्ये प्राध्यापकपासून ते कनिष्ठ निवासी पदापर्यंत भरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण हे पुणेच असणार आहे. नुकताच याबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची मुलाखत ही पदानुसार दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या गुरूवारी आणि मंगळवारी घेतल्या जातील. मुलाखतीसाठी उमेदवारांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे येथे पोहचावे लागणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांना सर्व कागदपत्रे सोबत आणावी लागणार आहेत.
वरिष्ठ निवासी पदासाठी एकून जागा 21, कनिष्ठ निवासी एकून जागा 19, सहायक प्राध्यापक एकून जागा 18, सहयोगी प्राध्यापक एकून जागा 12, प्राध्यापक एकून जागा 7 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही मोठी संधी असणार आहे.
या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे सर्वच पदांसाठी मुलाखत पद्धतीतूनच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारची किंवा कोणत्याच पदासाठी उमेदवाराला परीक्षा द्यायची नाहीये. या भरती प्रक्रियेत एकून 77 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया पुणे महानगरपालिकेकडून राबवली जात आहे.