पोलीस भरतीत मोठी रस्सीखेच, तब्बल 1 लाख 81 हजार 769 उमेदवारांचे अर्ज दाखल…

| Updated on: Jun 19, 2024 | 1:48 PM

Pune Police Recruitment 2024 : पोलीस भरतीसाठी अनेकजण इच्छुक असतात. हेच नाही तर बारावीनंतर पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांची संख्या अगदी मोठी आहे. आजपासून पुण्यात पोलिस भरतीला सुरूवात झालीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज ही दाखल केली आहेत.

पोलीस भरतीत मोठी रस्सीखेच, तब्बल 1 लाख 81 हजार 769 उमेदवारांचे अर्ज दाखल...
Police
Follow us on

पुणे शहर, ग्रामीण, लोहमार्ग पोलीस दल, तसेच कारागृह विभागातील 1219 पदांसाठी आज पोलिस भरती होत आहे. या पोलिस भरतीला अत्यंत मोठा प्रतिसाद हा मिळाल्याचे बघायला मिळतंय. या पोलिस भरतीसाठी तब्बल 1 लाख 81 हजार 769 उमेदवारांनी अर्ज केली आहेत. राज्यभरातून ही अर्ज आली आहेत. पुणे पोलीसांचे शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, ग्रामीण पोलिसांचे चव्हाणनगर येथील मुख्यालय, खडकीतील दारूगोळा कारखान्याच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडत आहे.

पुणे पोलीस दलातील 202 पदांसाठी 20 हजार 382 अर्ज आली आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण दलामध्ये 496 पदांसाठी 42 हजार 403 अर्ज आली आहेत. कारागृहातील शिपाई पदाच्या 513 जागांसाठी 1 लाख 10 हजार 488 उमेदवारांचे अर्ज केली आहेत. पुणे लोहमार्ग विभागाच्या 68 पदांसाठी 3 हजार 182 अर्ज आली आहेत.

उमेदवारांची शारीरिक मोजमाप पडताळणी आणि मैदानी चाचणीचा टप्पा आजपासून सुरू होत आहे. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय. मैदानी चाचणीनंतर परीक्षा देखील या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील केली जाईल.

ही पोलिस भरती अधिक पारदर्शी कशी करता येईल, यावर प्रशासन भर देताना दिसतंय. कोटेकोरपणे निवड प्रक्रिया राबवली जात असल्याचे देखील सांगितले जात आहे. हेच नाही तर प्रशासनाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, गैरप्रकाराची कोणतीही माहिती मिळाल्यास थेट कारवाई केली जाईल.

कोणत्याही अमिषाला बळी पडून नका, असे आवाहन प्रशासनाकडून भरती प्रक्रियेच्या उमेदवारांना करण्यात आलंय. भरती प्रक्रियेतील गैरप्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक देखील करण्यात आलीये. प्रशासनाची या भरती प्रक्रियेवर बारीक नजर आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून उमेदवार हे पुण्यात दाखल झाले आहेत.