रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, विविध पदांसाठी थेट भरती, अभियंता ते स्टेशन मास्तरपर्यंत…

| Updated on: Oct 09, 2024 | 2:52 PM

Railway Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे.

रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, विविध पदांसाठी थेट भरती, अभियंता ते स्टेशन मास्तरपर्यंत...
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची खास बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. भरती विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. दहावी ते पदवीधर उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

ही भरती प्रक्रिया कोकण रेल्वेकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून तंत्रज्ञ, स्टेशन मास्तर आणि अभियंता अशी विविध पदे भरली जातील. अगोदर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 ऑक्टोबर 2024 होती. आता अर्ज करण्याची मुद्दत वाढवली असून 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 

konkanrailway.com या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट पदानुसार आहे. दहावी पास, आयटीआय पास, अभियांत्रिकी पदवी. पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. 

फक्त शिक्षणच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 36 वयोगटापर्यंत उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. 850 रुपये शुल्क उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी भरावे लागेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फीस ही लागणार नाहीये.