दोन लाखांपर्यंत पगार, रेल्वे विभागात या पदांसाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड

| Updated on: Apr 11, 2024 | 12:24 PM

Railway Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन उमेदवारांना नसणार आहे.

दोन लाखांपर्यंत पगार, रेल्वे विभागात या पदांसाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड
Railway
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड होणार आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेची तयारी उमेदवारांनी करावी. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

ही भरती प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाची कंपनी RITES Ltd. साठी राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना वॉक इन इंटरव्यू द्यावे लागणार आहेत. 12 एप्रिल ते 16 एप्रिलमध्ये हे वॉक इन इंटरव्यू घेतले जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपल्याला https://www.rites.com या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. ही भरती प्रक्रिया 31 पदांसाठी पार पडत आहे. निवासी अभियंता, डिझाइन अभियंता, डिझाइन तज्ञ, प्रकल्प प्रमुख अशी विविध पदे ही भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखांपर्यंत पगार मिळणार आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी असल्याने शिक्षणाची आणि वयोगटाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. यासोबतच अनुभवाची अटही लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे.

या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला https://www.rites.com या साईटवर मिळेल. 16 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेला मुलाखत देण्याची शेवटची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना नो टेन्शन असणार आहे. थेट पद्धतीनेच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणतीही परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार नाहीये.