नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू

| Updated on: Jun 23, 2024 | 4:59 PM

Rajdhani College Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरतील सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू
job
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. डीयूच्या राजधानी कॉलेजकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया सहाय्यक प्राध्यापकांच्या पदासाठी सुरू आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया 62 पदांसाठी होतंय. विविध विषयांच्या जागांसाठी ही भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. rajdhanicollege.ac.in आणि du.ac.in. या साईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती देखील मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. यासोबतच उमेदवाराने UGC NET, CSIR UGC NET उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

टॉप 500 रँक असलेल्या विद्यापीठांमधून पीएचडी केलेले उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची अजिबातच गरज नाहीये. फक्त उमेदवारांना मुलाखत द्यावी लागेल. शैक्षणिक नोंदींच्या आधारे मुलाखतीसाठी निवड केली जाईल.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीस भरण्याचे टेन्शन नसणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.