रेल्वे विभागात 3015 जागांसाठी मेगा भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड

| Updated on: Jan 12, 2024 | 11:56 AM

Railway Recruitment Process 2024 : रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे. इच्छुक उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे दिवसच शिल्लक राहिले आहेत.

रेल्वे विभागात 3015 जागांसाठी मेगा भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड
Follow us on

मुंबई : रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याचे आहे स्वप्न? मग आता तुमचे हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते. रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही दहावी पास जरी असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी राबवली जातंय. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. चला तर मग करा फटाफट अर्ज.

रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात राहूनही अर्ज आरामात करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. 14 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला wcr.Indianrailways.gov.in या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही सविस्तरपणे मिळेल. ही भरती प्रक्रिया पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून 3015 पदे ही शिकाऊ उमेदवारांची भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 24 पेक्षा अधिक नसावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडीसी सूट ही देण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावीमध्ये 50 टक्के मार्क असावीत. तसेच उमेदवारीची दहावी ही मान्यता प्राप्त बोर्डामध्ये झालेली असावी.

उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला असणेही तितकेड महत्वाचे आहे. तब्बल 3015 पदांसाठी ही भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वाधिक खास बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत ही उमेदवाराला देण्याची गरज नाहीये. दहावी आणि आयटीआयच्या मार्कनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.