UBI Recruitment 2021 नवी दिल्ली : सरकारी नोकरी(Sarkari Naukri 2021)च्या शोधात असलेल्या लोकांसाठी बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने विविध पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक यासह विविध पदांसाठी भरती सुरु केली आहे. एकूण पदांची संख्या 347 आहे. इच्छुक उमेदवार www.unionbankofindia.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2021 आहे. रिक्त पदांविषयी अधिक तपशील खाली दिला आहे. (Recruitment for 347 posts including Manager in Union Bank of India, apply)
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 12 ऑगस्ट, 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 3 सप्टेंबर 2021
अर्जाची प्रिंट काढण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2021
ऑनलाईन फी जमा करण्याची तारीख – 12 ऑगस्ट, 2021 ते 3 सप्टेंबर, 2021
वरिष्ठ व्यवस्थापक (रिस्क) – 60
मॅनेजर (रिस्क) – 60
मॅनेजर (सिविल इंजिनिअर) – 7 पदे
मॅनेजर (आर्किटेक्ट) – 7 पदे
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनिअर) – 2 पदे
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) – 1 पद
मॅनेजर (फॉरेक्स) – 50 पदे
मॅनेजर (सीए) – 14 पदे
सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक अधिकारी) – 26
सहाय्यक व्यवस्थापक (फॉरेक्स) – 120
सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी आणि MBA / PGDBM किंवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, व्यवस्थापक पदांसाठी, संबंधित ट्रेड / विषय किंवा क्षेत्रात पदवी किंवा पीजी असणे आवश्यक आहे आणि किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी सीए, सीएफए, सीएस किंवा एमबीए किमान 5 वर्षांचा अनुभव पाहिजे.
सिनिअर मॅनेजर – उमेदवारांचे वय 30 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
मॅनेजर – उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
असिस्टंट मॅनेजर – उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणी – 850 रुपये
SC, ST, दिव्यांग – फी नाही
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Recruitment for 347 posts including Manager in Union Bank of India, apply)
लाँचिंगआधीच Jio Phone Next चे फीचर्स लीक, किंमत फक्त…#Reliance #JioPhoneNext #Jio #RelianceJiohttps://t.co/8reqvYmMyt
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 13, 2021
इतर बातम्या