नवी दिल्लीः DRDO Recruitment 2021: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने प्रशिक्षणार्थी पदासाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केलेत. या अंतर्गत एकूण 110 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट https://rac.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यात 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्याच वेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2021 असेल. अर्जदारांनी लक्षात घ्या की, शेवटची तारीख संपल्यानंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
डीआरडीओने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 110 पदांपैकी पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या 50 आणि तंत्रज्ञ पदविकाच्या 30 पदांची नियुक्ती केली जाईल. त्याचबरोबर प्रशिक्षित अप्रेंटिसच्या 26 पदांवर भरती होणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, नमूद केलेल्या रिक्त पदांची संख्या केवळ सूचक आहे आणि प्राप्त पात्र अर्जांच्या अंतिम मूल्यांकनावर आधारित नंतरच्या टप्प्यावर बदलू शकते.
आवश्यक पात्रता स्तरावर प्राप्त गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर उमेदवारांची निवड अॅप्रेंटिसच्या पदांसाठी केली जाईल. तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हर्च्युअल) पद्धतीने शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांसाठी वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सामील होताना ‘वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र’ सादर करावे लागेल. उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी मोबाईल/पेन ड्राइव्ह/लॅपटॉप/इलेक्ट्रॉनिक उपकरणे/कॅमेरा आणण्याची परवानगी नाही. निवडलेल्या उमेदवारांना हे लक्षात घ्यावे लागेल की, प्रशिक्षण कालावधी 12 महिन्यांचा असेल.
लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी प्रवेशपत्रासंदर्भातील माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध केली जाईल. पुढे आयटीआर उमेदवारांना लेखी चाचणी/मुलाखत कॉल लेटरची कोणतीही हार्डकॉपी पाठवणार नाही. अधिसूचनेत म्हटले आहे की, प्रवेशपत्र/कॉल लेटर प्राप्त करणे, डाऊनलोड करणे आणि प्रिंट करणे ही उमेदवाराची जबाबदारी असेल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या
TET Exam 2021 | टीईटीची तारीख पुन्हा बदलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा