यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (District collector office Yavatmal Recruitment 2021) येथे सुरक्षा रक्षक (Security Guard jobs) पदासाठी भरती सुरु आहे. एकूण 25 जागांसाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. या नोकरीबाबत इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे. (Recruitment for the post of Security Guard in the Collectorate in Yavatmal)
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार हे मिलिटरी किंवा पॅरामिलिटरीमधून निवृत्त झालेले असावेत. शिवाय उमेदवारांकडे स्वतःची बंदूक तसेच अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असणे अनिवार्य आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात काम करण्याची तयारी असावी. तसेच उमेदवारांना शारीरिक चाचणी उत्तीर्ण करणेही आवश्यक आहे. कामाच्या वेळे व्यतिरिक्त अतिरिक्त तास काम करण्याची उमेदवाराची तयारी असावी.
अधिकृत वेबसाईट : https://yavatmal.gov.in/
सुरक्षा रक्षक (Security Guard) – 10,000/- रुपये प्रति महिना
सुरक्षा रक्षक पदासाठी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि त्यानंतर मुलाखत अशाप्रकारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021
प्राप्त अर्जाची छाननी करणे – 21 सप्टेंबर 2021
प्राप्त अर्जाची छाननी करणे – 22 सप्टेंबर 2021
मुलाखत दिनांक – 23 सप्टेंबर 2021
शारीरिक चाचणी करिता निवड यादी – 27 सप्टेंबर 2021 (Recruitment for the post of Security Guard in the Collectorate in Yavatmal)
Electric Vehicles ना प्रोत्साहन देण्यासाठी निती आयोगाची ‘शून्य’ मोहीम#Shoonya #ShoonyaKiShuruat #NITIAayog #FutureofMobility
https://t.co/QRXJ5aXs0B— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2021
इतर बातम्या
CA Topper : सीए परीक्षेत भाऊ-बहिणीचे अव्वल यश, नंदिनी अग्रवाल 614 गुण मिळवून बनली AIR 1
34 तास कॉलिंग बॅटरी बॅकअप, 64GB स्टोरेजसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत 8 हजारांहून कमी