सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) पदवीधरांसाठी नोकरीची (Job Recruitment) सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदासाठी एकूण २१० पदांची ही भरती असून main.sci.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उमेदवाराला अर्ज करता येणार (Onilne Application) आहे. अर्जप्रक्रिया 10 जुलै 2022 रोजी बंद होईल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणार अपेक्षित आहे. संबंधीत पदासाठी ठराविक परीक्षा शुल्क असून उमेदवारासाठी वयोमर्यादा असणार आहे.
ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदासाठी उमेदवाराकडे पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग कमीतकमी ३५ शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे. तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तर उमेदवाराचे वय कमीतकमी १८ व जास्तीत जास्त ३० वर्ष असावे. आणखी माहितीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.
वरील पदासाठी उमेदवाराची लेखी परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी टंकलेखन चाचणी, वर्णनात्मक चाचणी होणार असून मुलाखत घेण्यात येईल. लेखी परीक्षेत (MCQs) प्रश्न असतील. लेखी परीक्षेत पात्र उमेदवाराला टंकलेखन चाचणीत सहभागी होणे अनिवार्य आहे.