सरकारी नोकरी (Government Job) शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी (Opportunity) आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India) अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. ही भरती स्केल 4 च्या अधिकाऱ्यांपर्यंत विविध पदांवर केली जाणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. 10 मे 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या बँक भरतीसाठी निवड प्रक्रिया काय असेल ? पगार किती असेल ? कोणत्या पदांवर नोकरी मिळणार ? या बद्दलची सर्व माहिती बातमीत दिलेली आहे. बीओआय रिक्रूटमेंटच्या वेबसाईटवर नोकरीची अधिसूचना bankofindia.co.in जारी करण्यात आली आहे.अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचं कमाल वय 38 असावं. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
हा फक्त बेसिक पे आहे. इतर सर्व भत्त्यांसह पूर्ण पगार उपलब्ध असेल. याशिवाय कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मिडल मॅनेजमेंट स्केल 2 या अधिकाऱ्याला दरमहा 1.75 लाख रुपये पगार मिळणार आहे. त्याचबरोबर स्केल 3 ऑफिसरला दरमहा 2.18 लाख रुपये पगार दिला जाणार आहे.
वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आहे. आपण खाली दिलेल्या बँक ऑफ इंडिया जॉब नोटिफिकेशन लिंकवर क्लिक करून संपूर्ण माहिती तपासू शकता.
बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा थेट ibpsonline.ibps.in तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. 26 एप्रिल 2022 पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 10 मे 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. अर्जाची प्रिंट तुम्हाला 25 मे 2022 पर्यंत घेता येईल. अर्जाची करण्यासाठीची लिंक पुढे दिली आहे. एससी आणि एसटीसाठी अर्ज शुल्क 175 रुपये आहे. इतर सर्व वर्गांसाठी 850 रुपये आहे.
रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, मुलाखत / गटचर्चेच्या आधारे करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.
Total On Regular Basis – 594
Total On Contract Basis – 102
Application – Click Here
Job Notification – Click Here
महत्त्वाची बातमी