बँकेत थेट अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आयडीबीआय बँकेकडून बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची संधी

| Updated on: Dec 06, 2023 | 3:05 PM

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता अनेकांनी पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे थेट तुम्हाला आयडीबीआय बँकेत काम करण्याची संधी आहे. ही बंपर भरती आहे. अगदी सोप्या पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. मग अजिबातच उशीर न करता आपण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

बँकेत थेट अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, आयडीबीआय बँकेकडून बंपर भरती, सरकारी नोकरी करण्याची संधी
Follow us on

मुंबई : बँकेत सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न आहे? मग तुमचे स्वप्न आता साकार होणार. थेट बँकेत सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. होय खरे ऐकले थेट एक अर्ज करा आणि मिळवा बँकेत सरकारी नोकरी. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. मग उशीर कशाला करता अर्ज करण्यासाठी लगेचच तयारीला लागा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेसंदर्भात बँकेकडून एक अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया रिक्त पदासाठी होतंय.

ही भरती प्रक्रिया थेट आयडीबीआय बँकेसाठी पार पडतंय. तब्बल 89 पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2023 आहे. ही भरती प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू होतंय. बँकेची वेबसाईट idbibank.in वर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना फीस ही भरावी लागणार आहे. ओपन आणि ओबीसी असलेल्या उमेदवाराला 1000 हजार रूपये तर प्रवर्गातील उमेदवाराला 200 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच पार पडणार आहे. शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवाराला आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. पदवीधर असलेला उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहे. तसेच उमेदवारासाठी कार्यालयीन कामाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच अट नाही तर वयाची देखील अट लागू करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 35 पेक्षा कमी असावे ही मोठी अट ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अर्ज व्यवस्थित वाचावा. ही भरती प्रक्रिया आयडीबीआय बँकेकडून स्पेशल ऑफिसर या पदासाठी राबवली जात आहे. उमेदवाराने आताच भरती प्रक्रियेच्या तयारीला लागणे आवश्यक आहे.