1455 जागांसाठी बंपर भरती, परीक्षा देण्याची नाही गरज, अर्ज करा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी

| Updated on: Nov 30, 2023 | 7:43 PM

सरकारी नोकरी करण्यावर अनेकांचा भर दिसतोय. मात्र, बऱ्याच वेळा आपल्याला सरकारी नोकरी हवी असती. मात्र, नेमक्या कोणत्या विभागात जागा आहेत, हेच अनेकांना कळत नाही. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.

1455 जागांसाठी बंपर भरती, परीक्षा देण्याची नाही गरज, अर्ज करा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी
Follow us on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. तब्बल 1455 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. आजच अर्ज करा आणि मिळवा थेट सरकारी नोकरी. 1455 पदांसाठी ही बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे तुम्ही कुठेही बसून आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे 21 ते 42 वयाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ukmssb.org. या वेबसाईटवर भेट द्या आणि लगेचच अर्ज करा. विशेष म्हणजे या वेबसाईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती मिळू शकते. मग उशीर कशाला लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

उत्तराखंडमध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 12 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ही शेवटची तारीख असणार आहे. फिस जमा करण्याची शेवटीची तारीख 1 जानेवारी आहे. तोपर्यंत आपल्याला फिस जमा करावी लागणार आहे. ही भरती प्रक्रिया नर्सिंग ऑफिसर पदांसाठी होत आहे. जर तुम्ही या भरती प्रक्रियेत अर्ज करणार असाल तर बीएससी नर्सिंगची पदवी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

बीएससी नर्सिंग असल्याशिवाय तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. या भरती प्रक्रियेची सर्वात खास गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची परीक्षा वगैरे अजिबात होणार नाहीये. अर्जांच्या आधारावर उमेदवारांनी थेट निवड केली जाईल. ओबीसी असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी 300 रूपये फिस लागणार आहे.

बाकी कास्टमध्ये येणाऱ्यांना 150 रूपये फिस भरावी लागेल. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना साधारण 44,900 ते 1,42,400 पर्यंत पगार मिळणार आहे. जर तुम्हीही सरकारी नोकरी करू इच्छित असाल तर अजिबात उशीर न करताना आजच अर्ज करा आणि मिळवा आपल्या हक्काची नोकरी. भरती प्रक्रियेची शेवटीची तारीख लक्षात ठेवा.

ukmssb.org. या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती मिळेल. तुम्हाला काही माहिती तिथे भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत आहे. तुमच्याकडे बीएससी नर्सिंगची पदवी आवश्यकच आहे, त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाहीत.