मुंबई : दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी आहे. रेल्वे विभागात ही बंपर भरती निघालीये. तब्बल 1600 पेक्षाही अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. लगेचच अर्ज करा. rrcpryj.org या अधिकृत साइटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही भरती असून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. 14 डिसेंबर 2023 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज हा करावा लागणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) कडून उत्तर मध्य रेल्वेमध्ये ही भरती राबवली जातंय.
हे लक्षात ठेवा की, ही भरती प्रक्रिया अपरेंटिस पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी फक्त दहावी पासच नाही तर तुमच्याकडे आयटीआयचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही अर्ज नाही करू शकत.
रेल्वेची ही भरती प्रक्रिया तब्बल 1664 पदांसाठी होत आहे. विविध विभागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. मॅकेनिकल डिपार्टमेंटमध्ये एकून 364, इलेक्ट्रिकल विभागात एकून 339, झांसी डिवीजनमध्ये एकून 528, आग्रा डिवीजनमध्ये एकून 296 पदे भरली जाणार आहेत. इलेक्ट्रीशियन, फिटर, पेंटर, स्टेनोग्राफर, मॅकेनिक अशा विविध विभागांमधील ही पदसंख्या आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारासाठी वयाची अट ही अत्यंत महत्वाची आहे. कमीत कमी उमेदवाराचे वय 15 तर जास्तीत जास्त 24 वर्षे असणे आवश्यक आहे. यामध्ये फक्त प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट देण्यात आलीये. मार्कनुसार मॅरिट लिस्ट तयार केली जाईल. त्यानंतर संबंधित उमेदवाराला कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाईल. rrcpryj.org या अधिकृत साइटवर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती मिळेल.
यानुसार एक फायनल लिस्ट रेल्वे विभागाकडून तयारी केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला 100 रूपये फिस भरावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच तुम्हाला तुमचे अर्ज दाखल करावे लागणार आहेत. rrcpryj.org या अधिकृत साइटवर जाऊन अर्ज करा. अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत आहे.