रेल्वे विभागात नोकरी करायची आहे? मग लगेच करा अर्ज, थेट 257 पदांसाठी भरती सुरू

| Updated on: Dec 06, 2023 | 1:51 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे संधी आहे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. अजिबातच उशीर न करता आजच अर्ज करा. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. रेल्वे विभागात मोठी बंपर भरती सध्या सुरू आहे. मग उशीर कशाला करता लगेच करा अर्ज.

रेल्वे विभागात नोकरी करायची आहे? मग लगेच करा अर्ज, थेट 257 पदांसाठी भरती सुरू
Follow us on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी तुम्ही करू शकता. बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे विभागात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उशीर न करता लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी. रेल्वेकडून ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी राबवली जातंय. पदवीधरांची कायमच ओरड असते की, नोकरी नाही. तर ही पदवीधरांसाठी मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. रेल्वेकडून पदवीधरांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मग उशीर कशाला करता थेट करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाहीत. वेळ अजिबात वाया न घालता लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. पदवीधरांसाठी ही संधी आहे. विशेष म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामुळेच आपण कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. विशेष म्हणजे रेल्वे विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. यामुळे अर्ज करताना ही गोष्ट लक्षात घ्या की, कोणत्या पदासाठी आपण अर्ज करत आहात.

भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील सर्वांसाठी वेगळी आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे आहे की, उमेदवाराने पदवीमध्ये 60 टक्के गुण घेतलेले असावेत. यासोबतच उमेदवाराचे सिग्नल, टेलीकॉम, इलेक्ट्रिकलस मेटलर्जी, मॅकेनिकल, बीए, बीबीए आणि बीकॉममध्ये पदवी असणे देखील आवश्यक आहे.

केमिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा झालेले लोकही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसंदर्भात अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट rites.com वर जावे लागेल. तिथे तुम्ही अर्ज करू शकता. RITES Graduate Apprentice Recruitment जाऊन तुम्ही तुमची सर्व डिटेल्स भरू शकता. परत एकदा या भरती प्रक्रियेसाठी शेवटची तारीख ही लक्षात ठेवा. ही भरती प्रक्रिया 257 पदांसाठी होत आहे.