मुंबई : बँकेत नोकरी करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. विशेष म्हणजे थेट बँक ऑफ बडोदामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट बँक ऑफ बडोदामध्ये तुम्ही नोकरी करू शकता. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत फक्त बी काॅमच असणे आवश्यक नाहीये. तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तरीही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात. पदवीधरांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग आजच करा अर्ज
बँक ऑफ बडोदामध्ये बँक मित्र पर्यवेक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवीधरांसाठी ही संधी म्हणावी लागेल. विशेष म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तरीही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही अत्यंत महत्वाची आहे.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्षे ते 40 असावे. बँक ऑफ बडोदाच्या कोल्हापूर शाखेतर्फे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. याबद्दलची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2023 आहे. यामुळे उमेदवारांनी लवकराच लवकर अर्ज करावेत.
25 डिसेंबर 2023 नंतर अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीयेत. उमेदवाराला संगणकासोबतच ईमेल आणि इंटरनेटची माहिती असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करता नाही येणार. खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी बँक ऑफ बडोदा, कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालय, विचारे कोम्प्लॅक्स, कोल्हापूर येथे करावा लागणार आहे. खरोखरच बँक ऑफ बडोदामध्ये काम करण्याची ही सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे. यामुळेच उशीर अजिबात न करता आजच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा 25 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे.