दहावी पास असणाऱ्यांसाठी संधी, नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी मेगा भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

| Updated on: Dec 04, 2023 | 2:47 PM

दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. दहावी पास तरूण नोकरीच्या शोधात असतील तर थेट अर्ज करून तुम्ही नोकरी मिळू शकता. विशेष म्हणजे अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. थेट नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. नेव्हल डॉकयार्डमध्ये मेगा भरती सुरू आहे.

दहावी पास असणाऱ्यांसाठी संधी, नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी मेगा भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
Follow us on

मुंबई : दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. थेट संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नौदल डॉकयार्ड भारतीय नौदल विशाखापट्टणम यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. यामुळे दहावी पास असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. फक्त दहावी पासच नाही तर उमेदवार हा आयटीआय पास असणे देखील आवश्यक आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी लेखी परीक्षा संपूर्ण देशभरात पार पडेल. नेव्हल डॉकयार्ड येथे शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरीचे ठिकाणे हे विशाखापट्टणम असेल. इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीमध्ये 50 टक्के गुणांसह पास होणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 14 वर्षे असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा ही 28 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे. तर या लेखी परीक्षाचा निकाल 2 मार्च रोजी घोषित केला जाणार आहे. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

मुलाखत ही 5 मार्च ते 8 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि लगेचच करा अर्ज. ही पदभरती एकून 275 पदांसाठी होतंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करताना ही काळजी घ्या की, आपण कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत.

मेकॅनिक डिझेल पदासाठी एकून जागा 23, सुतार पदासाठी एकून जागा 27, पाईप फिटर पदासाठी एकून जागा 23, चित्रकार एकून जागा 16, मेकॅनिक एकून जागा 15, इलेक्ट्रिशियन पदासाठी एकून जागा 21, गॅस आणि इलेक्ट्रिक पदासाठी एकून जागा 15, मशिनिस्ट पदासाठी एकून जागा 12, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक पदासाठी एकून जागा 10 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.