मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. उमेदवाराने उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. इच्छुकांना संबंधित पत्त्यावर आपले अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. उशीर न करता उमेदवाने आपले अर्ज हे दाखल करावेत. नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. ही भरती प्रक्रिया 18 जागेसाठी होत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सहाय्यक वैद्यकीय अधिकारीपासून ते दंत तंत्रज्ञ पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत असल्याने शिक्षणाच्या अट देखील पदानुसार आहे. या भरतीमध्ये भूलतज्ज्ञच्या पदाचा देखील समावेश आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज डिस्पॅच विभाग, जी बिल्डिंग, नायर हॉस्पिटल मुंबई या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 डिसेंबर 2023 असणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी आपले अर्ज हे दाखल करावेत. यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
अर्ज करताना उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. सहाय्यक वैद्यकीय अधिकारी एकून पदसंध्या 1, बालरोग सल्लागार एकून पदसंख्या 1, सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान एकून पदसंख्या 1, वैद्यकीय अधिकारी पदसंख्या 1, स्टाफ नर्स पदसंख्या 2, ऑडिओलॉजिस्ट पदसंख्या 1.
विशेष शिक्षक ग्रेड I एकून जागा 1, विशेष शिक्षक ग्रेड II एकून जागा 3, दंत तंत्रज्ञ एकून जागा 1, ऑर्थोपेडिक्स सल्लागार एकून जागा 1, व्यावसायिक समुपदेशक एकून जागा 1 आणि भूलतज्ज्ञ एकून जागा 1 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज पत्त्यावर पाठवावीत.