नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी खरगपूरमध्ये जेईई अॅडव्हान्ससाठी (JEE Advanced 2021) उद्यापासून अर्थात 11 सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. जेईईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन सुरुवातीच्या अडीच लाखांमध्ये नंबर पटकावणारे उमेदवार या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील. jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. आयआयटी जेईई परीक्षेसाठी नोंदणी (JEE Advanced 2021 Registration) करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2021 आहे. नोंदणीकृत उमेदवार 17 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतील. (Registration for JEE Advance Exam from tomorrow; know the details)
उमेदवारांसाठी प्रवेशपत्र 25 सप्टेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट पेपर-1 साठी असेल जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत चालेल. त्याचबरोबर दुसऱ्या शिफ्टमध्ये पेपर-2 साठी दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत परीक्षा घेण्यात येईल.
– नोंदणी प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 11 सप्टेंबर, 2021
– नोंदणीची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर, 2021
– प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख : 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2021
– जेईई अॅडव्हान्स परीक्षा : 3 ऑक्टोबर 2021
– जेईई अॅडव्हान्स 2021 च्या वेबसाइटवर उमेदवारांनी दिलेल्या प्रतिसादांच्या प्रती उपलब्धतेची तारीख – 5 ऑक्टोबर, 2021
– तात्पुरत्या उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन प्रदर्शन – 10 ऑक्टोबर, 2021
– तात्पुरत्या उत्तरपत्रिकांवर अभिप्राय आणि टिप्पण्या देण्याची मुदत : 10 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर, 2021 पर्यंत
– आर्किटेक्चर अॅप्टीट्यूट टेस्ट : 18 ऑक्टोबर 2021
– एएटी निकालांची घोषणा : 22 ऑक्टोबर 2021
– आसन वितरण प्रक्रियेची संभाव्य सुरुवात : 16 ऑक्टोबर 2021
विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्सच्या मदतीने परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील.
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा.
स्टेप 2: त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या Application Form लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: आता नवीन नोंदणीच्या (New Registration) लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.
स्टेप 5: आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा, फोटो अपलोड करा आणि स्वाक्षरी करा.
स्टेप 6: त्यानंतर अर्ज फी सबमिट करा.
स्टेप 7: सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या. (Registration for JEE Advance Exam from tomorrow; know the details)
आयटी रिटर्न फाईल करण्याची मुदत वारंवार का वाढतेय? जाणून घ्या तुम्हाला आयटी रिटर्न कधी फाईल करावा लागेल?https://t.co/96Lv4yGuhZ#IncomeTax |#ITRFilling |#Extended |#Reason
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
इतर बातम्या