नवी दिल्ली: रेल्वे विभागातील आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा-1 (RRB NTPC CBT) निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल आणि सीबीटी परीक्षा भाग दोन विरोधात बिहारमधील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनजवळील एका पॅसेंजर ट्रेनमध्ये आग लावली होती. विद्यार्थ्याच्या तीव्र विरोधानंतर आरआरबी एनटीपीसी निकालावर फेरविचार करणार असल्याचं रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्यावतीनं (RRB) सांगण्यात आलं आहे. आरआरबी एनटीपीसी सीबीटी 2 आणि ग्रुप डी सीबीटी परीक्षा 1 ला (Group D CBT exam 1)स्थगिती देण्यात आली आहे. परीक्षा आणि निकालावर फेरविचार केल्यानंतर पुन्हा नव्या तारखा जाहीर केल्या जातील. निकालावर विचार करण्यासाठी एक समिती दाखल करण्यात आली आहे. या समितीत उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण जालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या आक्षेंपावर विचारविनिमय करण्यात येईल त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.आरआबी एनटीपीसी निकालाविरोधात लाखो विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रेल्वे स्टेशनवर आंदोलन केलं होतं.
आरआरबी बोर्डाकडून आरआरबी एनटीपीसी निकाल जाहीर झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांनी यामध्ये गैरप्रकारा झाल्याचा दावा करत आंदोलन केलं होतं. बिहारमध्ये गेल्या दोन दिवसात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांनी काही ठिकाणी रेल्वे अडवल्या काही ठिकाणची रेल्वे स्टेशन देखील ताब्यात घेतली होती. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्येही निकालाविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. आरआबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा 1 डिसेंबर 2020 ते जुलै 2021 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेला 1 कोटी 40 लाख विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल 14 आणि 15 जानेवारीला जाहीर करण्यात आला होता. यानंतर विद्यार्थ्यांनी निकालात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विरोध सुरु केला होता. समाजमाध्यमांवर विद्यार्थ्यांनी निकालाचा विरोध केला होता.
विद्यार्थ्यांनी आरा स्टेशनवरील पश्चिम गुमटी जवळ उभ्या असलेल्या सासाराम आरा पॅसेंजरच्या इंजिनमध्ये आग लावली, . त्यानंतर लोको पायलट रवि कुमारनं इंजिनला इतर डब्यांपासून वेगळं केलं आणि त्यानंतर स्वत: चा जीव वाचवण्यासाठी इंजिनमधून उडी मारली. लोको पायलटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रेल्वेचं इंजिन जळून खाक झालं आहे. एनटीपीसी परीक्षा पॅटर्नमधील बदल आणि निकालातील गैरप्रकाराविरोधात नाराज विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन करत रेल्वे ट्रॅक जाम केला होता. आंदोलनामुळं संबंधित ट्रॅकवरील वाहतूक बंद झाली होती. यानंतर सासाराम आरा पॅसेंजर ट्रेनला आऊटर जवळ थांबवण्यात आलं होतं. मात्र, विद्यार्थी तिथं पोहोचले आणि त्यांनी ट्रेनच्या इंजिनला आग लावून दिली. यानंतर इंजिन जळून गेलं.
इतर बातम्या
मनात मांडे खाऊ नका, गोव्यात सत्ता तर आमचीच येणार; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला
KCC कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी : योजना एक अन् फायदे अनेक, वेळेत परतावा केल्यास व्याजदरही घटणार
RRB NTPC result Students RRB Set up committee for solve result issue raised by students