RRB, SECR Recruitment 2021: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने (SECR) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शेकडो पदांसाठी रिक्त पदे जारी केली आहेत. (Sarkari Naukri 2021). दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 339 अपरेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. या जागा 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहेत. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकऱ्यांची ही एक उत्तम संधी आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे. ही भरती रेल्वेच्या विविध विभागांसाठी आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक पाहा.
दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
उमेदवारांचे वय 15 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असावे.
10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.
इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट apprenticeship.org पर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, (SECR) अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. अॅप्रेंटिसच्या एकूण 432 पदांची भरती केली जाईल. यासाठी, अर्ज करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतील.
निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल आणि प्रत्येक ट्रेडसाठी 1 वर्ष कालावधीचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना छत्तीसगड राज्य सरकारच्या नियमांनुसार प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड दिला जाईल. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण संपुष्टात येईल.
जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी 10+2 प्रणाली किंवा त्याच्या समकक्ष अंतर्गत 10 वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, त्यांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केला पाहिजे. उमेदवाराची वयोमर्यादा 15 वर्षांपेक्षा जास्त आणि 24 वर्षांपेक्षा कमी असावी.
संबंधित बातम्या
Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात परीक्षेशिवाय SSC अधिकारी होण्याची संधी, वाचा सविस्तर