SBI Clerk 1st Waiting List : स्टेट बँक भरतीची लेटिंग लिस्ट जारी, अशी करा डाऊनलोड

| Updated on: Mar 22, 2021 | 10:20 PM

या रिक्त पदांसाठी मुख्य परीक्षा 31 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली होती, ज्याचा निकाल 24 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. (SBI clerk first waiting list issue on official website, check on sbi.co.in)

SBI Clerk 1st Waiting List : स्टेट बँक भरतीची लेटिंग लिस्ट जारी, अशी करा डाऊनलोड
आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करा
Follow us on

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्युनियर असोसिएट (Regular Post) आणि कनिष्ठ असोसिएट (Backlog Post) भरतीची पहिली वेटिंग यादी जारी केली आहे. या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत (SBI Clerk Main Exam 2020) निवडलेले उमेदवार अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन ऑनलाईन यादी तपासू शकतात. या रिक्त पदांसाठी मुख्य परीक्षा 31 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्यात आली होती, ज्याचा निकाल 24 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला होता. (SBI clerk first waiting list issue on official website, check on sbi.co.in)

थेट लिंकवर तपासा यादी

ज्युनियर असोसिएट (Regular Post) आणि कनिष्ठ असोसिएट (Backlog Post) या पदांच्या भरतीसाठी जाहीर झालेल्या या व्हॅकेन्सीमध्ये एकूण 8134 पदे भरली जाणार आहेत. ज्युनियर असोसिएटसाठी 8000 आणि कनिष्ठ सहकारी पदासाठी 134 पदे आहेत. या रिक्त पदासाठीची पहिली प्रतिक्षा यादी (SBI Clerk 1st Waiting List) वेबसाईटवर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. ही यादी डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन थेट लिंकवर क्लिक करुन पाहू शकता.

अशी चेक करा वेटिंग लिस्ट

प्रतिक्षा यादी तपासण्यासाठी प्रथम sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावरील जॉईन एसबीआयच्या लिंकवर क्लिक करा. आता ‘JOIN SBI- RECRUITMENT RESULTS & ARCHIVE’ च्या लिंकवर जा. येथे रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख प्रविष्ट करा. आता प्रतीक्षा यादीची एक प्रत पीडीएफ स्वरूपात दिसून येईल. आपल्या रोल नंबरनुसार यादी तपासा.

भरतीचा तपशील

या रिक्त जागेत एकूण 8134 पदांवर भरती होणार आहे. कनिष्ठ असोसिएटसाठी 8000 पदे आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 3447, ओबीसीसाठी 1803, अनुसूचित जातीसाठी 1214, एसटीसाठी 746 आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी 790 जागा समाविष्ट आहेत. एसबीआयमधील नोकरीसाठी ही एक चांगली संधी होती. यामध्ये कनिष्ठ सहकारी (Backlog Post)साठीही 134 पदे निश्चित करण्यात आली आहेत. (SBI clerk first waiting list issue on official website, check on sbi.co.in)

इतर बातम्या

Maruti Suzuki Car Price Hike: येत्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण, मुंबई, पुणे, नागपुरातील काय स्थिती?