स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) कडून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 35 जागांसाठी ही भरती आहे. विशेष म्हणजे या नोकरीचं ठिकाण नवी मुंबई (Navi Mumbai) आहे. त्यामुळे बँकेत नोकरी आणि तीही मुंबईत ही उत्तम संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या (Specialist Cadre Officers) रिक्त जागांसाठी हे अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे ते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात.
स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या भरतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन अर्ज जारी केले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2022 आहे. त्यामुळे उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 35 रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या पदांवर नियुक्ती मिळेल.
अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करायची शेवटची तारीख – 17 मे 2022
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
एकूण रिक्त पदे – 35
निवड पद्धत – परीक्षा
परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 16 जून 2022
25 जून 2022 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरतीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने ठरवल्यानुसार ही परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र 16 जून 2022 रोजी जारी केले जाणार आहे. परीक्षेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी किंवा नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी बँकेने भरती प्रक्रियेसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना व्यवस्थित वाचावी.
टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.