SBI SCO Admit Card 2021: स्टेट बँकेकडून स्पेशालिस्ट केडर ऑफिसर परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

| Updated on: Sep 16, 2021 | 4:28 PM

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदाच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता ते प्रवेशपत्र 25 सप्टेंबरपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.

SBI SCO Admit Card 2021: स्टेट बँकेकडून स्पेशालिस्ट केडर ऑफिसर परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
job
Follow us on

SBI SCO Admit Card 2021 नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदाच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता ते प्रवेशपत्र 25 सप्टेंबरपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी sbi.co.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. स्टेट बँक ऑफ इंडिया या परीक्षेद्वारे असिस्टंट मॅनेजर, सिव्हील पदावरं 30 उमेदवारांची निवड करणार आहे. देशभरात ही परीक्षा आयोजित केली आहे. याशिवाय असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकलच्या 30 पदांवर भरती होणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांनी परीक्षा देण्यापूर्वी बँकेने जारी केलेले अधिकृत नोटिफिकेशन वाचणं आवश्यक आहे. लेखी परीक्षेनंतर मुलाखत आयोजित केली जाणार आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं?

स्टेप 1 : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2 : वेबसाईटवरील करिअर टॅबवर क्लिक करा पुढे करंट ओपनिंग्ज वर क्लिक करा
स्टेप 3 : एसबीआय एसीओ रेग्युलर बेसिससाठी प्रवेशपत्र लिंक वर क्लिक करा
स्टेप 4 : नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवून लॉगिन करा
स्टेप 5 : प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिटं काढून ठेवा

एसबीआय एसीओ परीक्षा 90 मिनिट आणि 45 मिनिट कालावधी साठी घेतली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी सामान्य क्षमता चाचणी आणि व्यावसायिक ज्ञान चाचणी साठी अर्ज केला असेल त्यांना तार्किक क्षमता, गणितीय क्षमता, इंग्रजी आणि इतर प्रश्न विचारले जातील. याशिवाय यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीला सामोरं जावं लागणार आहे. लेखी परीक्षेला 70 टक्के तर मुलाखतीमधील गुणांना 30 टक्के वेटेज देण्यात आलं आहे.

आयसीएआय सीए परीक्षेची नोंदणी सुरु

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउँटंट ऑफ इंडियानं (ICAI) सीएच्या विविध डिसेंबर महिन्यातील विविध परीक्षासांठी नोंदणीप्रक्रिया सुरु केली आहे. डिसेंबर महिन्यातील परीक्षांसाठी नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे ते icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन अर्ज करु शकतात. 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. मात्र, त्यांना विलंब शुल्क 600 रुपये भरावं लागेल.

कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना अर्ज करता येणार?

आयसीएआयनं दिलेल्या माहितीनुसार चार्टर्ड अकाऊँटंटस फायनल, इंटमिजीएट, इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट, टेक्निकल एक्झामिनेशन, इंटरनॅशनल टॅक्सेशन असेसमेंट टेस्ट या परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान आहे.

सीए परीक्षा नोंदणी फी

इच्छुक उमेदवार अंतिम मुदतीपूर्वी अधिकृत वेबसाईट icaiexams.icai.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय केंद्रांतील उमेदवारांसाठी अर्ज फी 1500 रुपये आणि विलंब शुल्क 600 रुपये भरावे लागतील. काठमांडू वगळता इतर परदेशी केंद्रांसाठी फी 325 अमेरिकी डॉलर आणि विलंब शुल्क 10 अमेरिकन डॉलर आहे.

इतर बातम्या:

ICAI CA May Exam 2021: मे महिन्यातील सीए परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

ICAI CA Foundation June 2021: जून महिन्यातील सीए फाऊंडेशन परीक्षेसाठी नोंदणी सुरु, रजिस्ट्रेशनसाठी वाचा सोप्या टिप्स

SBI SCO Admit Card 2021 released on sbi.co.in exam will held on 25 september