पुणे: दहावीसह बारावीच्या (10th and 12th) पुरवणी परीक्षेची मोठी बातमी हाती येतीये. पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक (Timetable) आलेलं आहे. बारावीची आणि दहावीची पुरवणी परीक्षा यासंदर्भातली ही बातमी आहे. बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून 12 ऑगस्ट पर्यंत होणार आहे. तर दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा, पुन्हा अभ्यास करा आणि पास व्हा! तारखा (Important Dates) मात्र लक्षात ठेवा.
दरम्यान दहावीचा निकाल लागलेला आहे. यंदा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागलेला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के लागेलेला आहे. कोविडमुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यूपीएससी, बारावी आणि आता दहावी! दहावीच्या परीक्षेत सुद्धा मुलींनीच बाजी मारलेली आहे. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागलाय. दरम्यान या सगळ्या घडामोडीत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतीये.
निकालाची तारीख घोषित करताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देते की उद्याचा निकालाचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असो. आपल्याला आयुष्यात जी मोठी कामगिरी करायची आहे त्यासाठी उद्याचा निकाल हा आपल्या आयुष्यातील माईलस्टोन होवो हीच शुभेच्छा! दहावीचं वर्ष शैक्षणिक जीवनातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो हा टप्पा पार करण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा!” असं त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th