रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचं असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत पुन्हा एकदा भरती होणार आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेने विविध कार्यशाळा आणि युनिटमध्ये अप्रेंटिसच्या 1700 पेक्षा जास्त पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. या भरतीची अधिकृत नोटीस जाहीर करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2024 पासून म्हणजे कालपासूनच अधिकृत वेबसाइट iroams.com वर सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारीख 27 डिसेंबर 2024 रोजी सायं 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 27 डिसेंबरच आहे.
जे उमेदवार त्यांच्या शिक्षणानंतर चांगल्या ठिकाणी अप्रेंटिसशिप करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. रिक्तपदांची माहिती आणि नोटिफिकेशन लिंक खाली दिली आहे.
अप्रेंटिस
पदे भरावयाची
1785
RRC SER Recruitment 2024
Official Notification Download PDF
रेल्वे अप्रेंटिसच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास किंवा त्याच्या समकक्ष परीक्षेत पास असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेड/ब्रांचमध्ये ITI सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. पात्रतेसंबंधी इतर माहिती उमेदवार अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पाहू शकतात.
रेल्वे अप्रेंटिसच्या या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी किमान वय 15 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 24 वर्षे केलेली असावीत. उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 च्या आधारावर गणना करण्यात येईल. वयोमर्यादेत आरक्षित वर्गांसाठी सवलत दिली जाईल.
रेल्वे अप्रेंटिससाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया कोणतीही परीक्षा न घेता, सरळ मार्क्सच्या आधारे तयार केलेल्या मेरिटच्या माध्यमातून केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या सत्यापनासाठी बोलावले जाईल.
अर्ज करताना सामान्य आणि ओबीसी उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि महिलांना अर्ज शुल्कात सवलत दिली जाईल. रेल्वेच्या या भरतीसंबंधी इतर कोणतीही माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी आरआरसी दक्षिण-पूर्व रेल्वे कोलकाताच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.