बेरोजगारी (Unemployment) ! आजचा सगळ्यात सगळ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न. ज्या देशात, राज्यात बेरोजगारी जास्त असते असा देश, असं राज्य तिथलं सरकार हे अपयशी सरकार (Government)असल्याचं म्हटलं जातं. कोरोना (Corona) महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या लोकांचे आर्थिक दृष्ट्या खूप हाल झाले. आज अजूनही परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी लोकांची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. सरकारी नोकरदार सोडले तर खाजगी नोकरदारांना वेळेवर पगार न मिळणं, पूर्ण पगार न मिळणं किंवा मुळातच नोकरी न मिळणं आणि मिळाली तरी खूपच कमी पगार मिळणं या अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. राजकीय वर्तुळात भोंगे, निवडणुका,आरोप प्रत्यारोप, सभा झाली कि त्याला उत्तरसभा हे सत्र चालूच आहे. सभेला उत्तरसभा घेतील, आरोपावर प्रत्यारोप करतील पण बेरोजगारीवर कुणीही बोलणार नाही.
एप्रिल महिन्यातील रोजगारात झालेली वाढ ही मुख्यतः उद्योग आणि सेवा क्षेत्रात नोंदवण्यात आलीये. गंभीर बाब म्हणजे या काळात कृषी क्षेत्रातील रोजगार 52 लाखांनी कमी झाला. मॉन्स्टर इंडियानं केलेल्या ऑनलाईन रोजगारांच्या अभ्यासातून भारतात रोजगार भरतीत दरवर्षी 15 टक्के तर प्रत्येक महिन्यात चार टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या मुद्द्यांवर सरकार कधी बोलणार ? कोरोना महामारीत ज्या लोकांनी नोकऱ्या गमावल्या ते आज कुठे आहेत ? रोजगाराचं काय ? नवीन नोकऱ्यांची संधी कधी मिळणार ? या सगळ्या समस्या आत्ताच्या पास आऊट झालेल्या मुलांना भेडसावतायत. इंजिनिअरिंग करा, नाहीतर phD नोकरी उपलब्ध नाही. देशातली, राज्यातली तरुण बेरोजगार पोरं आज घरात बसून सभा आणि उत्तरसभा बघतायत आणि उरलेल्या वेळात बेरोजगारीवरचे व्हाट्सअप स्टेटस स्क्रोल करतायत. करतील काय ? बेरोजगाराचं दुःख बेरोजगार असणाऱ्यालाच माहित. हे दुःख कुठून व्यक्त करणार. या दुःखावर कधी शायरी तर कधी कविता लिहिली जाते. बघुयात अशाच काही बेरोजगारीवर आधारित असणाऱ्या शायऱ्या. आता हे वाचून तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.