नवी दिल्ली: बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. साऊथ इंडियन बँकेने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार साऊथ इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट देऊन अर्ज सादर करु शकतात.
साऊथ इंडियन बँकेत पीओ पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतील नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर आहे. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी बँकेची अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा. मात्र, परीक्षा आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
स्टेप 1: सर्वप्रथम साऊथ इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट southindianbank.com ला भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या CAREERS वर क्लिक करा.
स्टेप 3: पुढेEMPLOYEEE DEVELOPMENT आणि CAREER GROWTH वर क्लिक करा.
स्टेप 4: साऊथ इंडियन बँक एसआयबी प्रोबेशनरी ऑफिसर पीओ भर्ती 2021 च्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 5: संपूर्ण अर्ज भरुन माहिती सादर करा
स्टेप 6: अर्ज पूर्ण केल्यानंतर, फॉर्मची प्रिंट आउट घ्या.
बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंतची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षेला 50% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच 2 वर्षांचा अनुभव देखील असावा. उमेदवारांचे वय 28 वर्षांपेक्षा कमी असावे. 31 जुलै 2021 रोजीचं वय मोजलं जाणार आहे.
साऊथ इंडियन बँकेने जारी केलेल्या भरती प्रक्रियेअतंर्गत अर्ज करणाऱ्या खुल्या, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये अर्ज शुल्क निश्चित केले आहे. एससी-एसटी आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना 800 रुपये अर्जाचं शुल्क जमा करावे लागेल. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पद्धतीने फी भरता येते. अधिक माहितीसाठी उमदेवारांनी बँकेच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय.
इतर बातम्या:
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीमध्ये 300 प्रशासकीय अधिकारीपदांसाठी भरती, 21 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
Bank Job 2021: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये SO पदासाठी भरती, अर्ज कसा कराल?
South Indian Bank Application Started for PO Post know how to Apply and check details