South Indian Bank Recruitment 2022 : बँकेत नोकरीची संधी! परीक्षेचे स्वरूप ते वेतन, जाणून घ्या एका क्लिकवर…

| Updated on: Jan 05, 2022 | 10:06 PM

ऑनलाइन चाचणीच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल.फेब्रुवारी 2022मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल. सर्वसाधारण प्रवर्गतील उमेदवारांसाठी 800 रुपये तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्जशुल्क असेल.

South Indian Bank Recruitment 2022 : बँकेत नोकरीची संधी! परीक्षेचे स्वरूप ते वेतन, जाणून घ्या एका क्लिकवर...
South Indian Bank Career Homepage
Follow us on

नवी दिल्ली : तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असल्यास तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी! खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक साऊथ इंडियन बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागितले आहेत. प्रोबेशनरी अधिकारी आणि प्रोबेशनरी क्लर्क या पदासाठी भरतीची जाहिरात बँकेने प्रकाशित केली आहे. अनुभवी आणि नवोदित उमेदवारांना यापदांसाठी अर्ज करण्याची मुभा आहे. पदांचे स्वरूप ते वेतन याविषयी सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अनुभवाचे निकष

• PO नवोदित: इयत्ता 10 वी, 12 वी आणि किमान 60% गुणांसह अभियांत्रिकीची पदवी किंवा इयत्ता 10 वी, 12 वी तसेच पदवी आणि किमान 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी

• PO अनुभवी : इयत्ता 10 वी, 12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण, कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील किमान 2 वर्षांचा स्केल 1/ऑफिसर केडरच्या कामाचा अनुभव

• क्लार्क नवोदित : इयत्ता 10 वी, 12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील पदवी

• क्लार्क अनुभवी : इयत्ता 10 वी, 12 वी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण कला/वाणिज्य/विज्ञान/अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण, कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतील किमान 2 वर्षांचा क्लार्क केडरचा अनुभव.

वयोमर्यादा

साऊथ इंडियन बँकेसाठी पदनिहाय वयोमर्यादा विभिन्न आहे. बँकेच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती देण्यात आली आहे.

• PO नवोदित आणि क्लर्क नवोदित : 26 वर्षे
• PO अनुभवी आणि क्लर्क अनुभवी : 28 वर्षे

परीक्षेचे स्वरूप

ऑनलाइन चाचणीच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल.फेब्रुवारी 2022मध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. परीक्षेतील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल. सर्वसाधारण प्रवर्गतील उमेदवारांसाठी 800 रुपये अर्जाचे शुल्क आहे. अन्य प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रियेस सुरुवात – 5 जानेवारी 2022
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख – 11 जानेवारी 2022

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी. परीक्षेचे स्वरूप ते पदाचे वेतन याविषयीची सविस्तर माहिती southindianbank.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय सैन्यांत सेवेचं स्वप्न: 10 वी व 12 वी उत्तीर्णांसाठी संधी, 63 हजारांपर्यंत वेतन

Bloating Remedy: जेवल्यानंतर पोटात तयार होतो गॅस, औषधांपेक्षा अधिक फायदेशीर आहेत या 7 औषधी वनस्पती

हिवाळ्यात फाटलेल्या ओठांची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर!