SSC GD Constable Recruitment 2021: कॉन्स्टेबल जीडी भरतीचं नोटिफिकेशन लवकरच निघणार? 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

| Updated on: Jun 06, 2021 | 2:11 PM

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यापूर्वी कोरोना स्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर कॉन्स्टेबल जीडीचं नोटिफिकेशन काढलं जाईल असं म्हटलं होत. SSC GD constable recruitment notification

SSC GD Constable Recruitment 2021: कॉन्स्टेबल जीडी भरतीचं नोटिफिकेशन लवकरच निघणार? 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय निमलष्करी पोलीस दलांमध्ये कॉन्स्टेबल (SSC GD Constable Recruitment 2021) भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं. स्टाफ सिलेक्शन कमिशननं यापूर्वी 7 मे रोजी नोटिफिकेशन कोरोना संसर्गामुळं जाहीर करत नसल्याचं म्हटलं होतं. कोरोना संसर्गामुळं आतापर्यंत दोन वेळा नोटिफिकेशन जाहीर करण्याऐवजी लांबणीवर टाकण्यात आलं होतं. सीमा सुरक्षा बल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP), सशस्त सीमा बल (SSB),नॅशनल इनवेस्टिगेशन एजन्सी(NIA ) आणि सचिवालय सुरक्षा बल (SSF)आसाम रायफल्समध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. (SSC GD constable recruitment notification 2021 will released by Staff Selection Commission at end of June)

कोरोनाचं संकट कमी झाल्यावर नोटिफिकेशन निघणार

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यापूर्वी कोरोना स्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर कॉन्स्टेबल जीडीचं नोटिफिकेशन काढलं जाईल असं म्हटलं होत. मात्र, आयोगाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत नोटिफिकेशन जारी केलं जाईंल, असा अंदाज आहे. जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु इच्छितात त्यांनी अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर भेट द्यावी. स्टाफ सिलेक्शन कमिशन सीएपीएफ जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी 25 एप्रिलला नोटिफिकेशन जाहीर केलं जाणार होत. मात्र, कोरोनामुळं मे महिन्यातही घोषणा करण्यात आली नाही.

10 वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

सीएपीएफच्या कॉन्स्टेबल जीडी पदासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड कॉम्प्युटर आधारित टेस्ट, शारीरीक क्षमता, मेडिकल टेस्ट याच्या आधारावर केली जाणार आहे.

55 हजार पदांसाठी  निवड प्रक्रिया?

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 55915 जागांवर भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये 47582 जागा पुरुष उमेदवारांसाठी तर 8333 जागा महिला उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये 60210 मध्ये पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्याचा निकाल जानेवारी 2021 मध्ये जाहीर झाला होता.

वेतन, वय, पात्रता

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी 21700-69100 इतक वेतन दिलं जाते. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक असून त्याचं वय 18 ते 23 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्यज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी, तार्किक क्षमता याविषयी प्रश्न विचारले जातात. यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी आहे. तर, महिला, एससी, एसटी आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी आकारली जात नाही.

हेही वाचा :

स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : राजेश टोपे

आधी सरकारने भूमिका जाहीर करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू: उदयनराजे भोसले

(SSC GD constable recruitment notification 2021 will released by Staff Selection Commission at end of June)