SSC Jobs : उठा माऊली ! विठ्ठलाचं नाव घ्या आणि अर्ज करा, स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती काढलीये…

| Updated on: May 13, 2022 | 3:35 PM

विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास तरुणही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या अधिसूचनेनुसार या विविध पदांवर वेगवेगळी पात्रता असणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात

SSC Jobs : उठा माऊली ! विठ्ठलाचं नाव घ्या आणि अर्ज करा, स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती काढलीये...
स्टाफ सिलेक्शन कमिशन
Image Credit source: स्टाफ सिलेक्शन कमिशन official website
Follow us on

सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने 2065 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरू शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये (CBT) मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. विशेष म्हणजे दहावी आणि बारावी पास तरुणही काही पदांसाठी अर्ज करू शकतात. आयोगाच्या अधिसूचनेनुसार या विविध पदांवर वेगवेगळी पात्रता असणाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दहावी पास उमेदवार काही पदांसाठी अर्ज करू शकतात, काही पदांसाठी 12 वी पास आणि काही पदांवर पदवीधर आणि पोस्ट ग्रॅज्युएट तरुण अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.

पदांची नावं

Junior Technical Assitant, Junior Draftsman, Deputy Ranger, Jr.Fishing Gear Technologist, Bosun( C,Junior Technical Assistant (Chemical), Drilling Assistant Grade-I,II, Techinical Assistant (Publication), Library and Information Assitant, Senior Technical Assistant (Survey), Laboratory Assitant Garde-III, Junior Chemist, Store Keeper Grade II, Laboratory Assistant Grade- II, Draftsman Grade- I, Handicrafts Promotion Officer, Senior Technical Assitant (Drawing), Research Assistant (Engineering), Research Assistant (Scientific), Laboratory Attendant, Multi Tasking Staff, Driver, Canteen Attendant, Assistant & other.

अर्ज शुल्क

भरतीशी संबंधित आवश्यक तारखा

  1. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख- 12 मे 2022
  2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 जून 2022
  3. ऑनलाईन अर्ज फी जमा करण्याची शेवटची तारीख- 15 जून 2022
  4. ऑफलाईन चलन जमा करण्याची शेवटची तारीख- 18 जून 2022
  5. अर्ज दुरुस्तीची तारीख- 20 जून 2022 ते 24 जून 2022
  6. संगणक आधारित परीक्षेची तारीख- ऑगस्ट 2022

इतर माहिती

नोकरीचं ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करायची शेवटची तारीख – 13 जून 2022

शैक्षणिक पात्रता – दहावी/ बारावी/ पदवीधर

असा करा अर्ज

  • सर्वप्रथम एसएससी ssc.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पोर्टलवर नोंदणी करून लॉग इन करा.
  • आता तुम्ही येथे अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर अर्ज शुल्क भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट काढा.

महत्त्वाचे

Official Website – Click Here

Notification – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.