सर्वोच्च न्यायालयाकडून भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ‘ही’ तारीख…

| Updated on: Aug 18, 2024 | 2:58 PM

Supreme Court Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाकडून भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ही तारीख...
Supreme Court
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक बंपर भरती आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार आहे. हेच नाही तर थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ न घालता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. थेट सर्वोच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. लवकरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू होईल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. 

सर्वोच्च न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरू होतंय. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. ही भरती प्रक्रिया 80 पदांसाठी राबवली जात आहे. कनिष्ठ न्यायालय अटेंडंट पदासाठी ही भरती सुरू आहे. 

ही भरती प्रक्रिया कुक या पदासाठी आहे. या भरती प्रक्रियेतील सर्वात मोठा नियम हा आहे की, अर्ज करणाऱ्या उमेदवाराला स्वयंपाक यायला हवा. यासोबतच उमेदवाराकडे पाककला या विषयात किमान एक वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे या क्षेत्रात किमान तीन वर्षे काम करण्याचा अनुभवही असणे आवश्यक आहे.

हेच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाचीही अट लागू करण्यात आलीये. 18 ते 27 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी sci.gov.in. या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. sci.gov.in. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. 

12 सप्टेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर स्वयंपाकासाठी प्रात्यक्षिक ट्रेड चाचणी द्यावी लागेल आणि त्यानंतर उमेदवाराची वैद्यकीय तपासणी देखील केली जाईल. त्यानंतर निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.