नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने (North East Frontier Railway) अप्रेंटिस पदांसाठी (Apprentice) भरती जाहीर केली आहे. एकूण 5636 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. या पदासाठी अर्ज करायची पद्धत ऑनलाईन आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन अर्ज करू शकतात. 1 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ती 30 जून 2022 पर्यंत चालणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ही निवड तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे. दहावी परीक्षा पास किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा पद्धतीखालील) परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तेही मान्यताप्राप्त मंडळातून. शिवाय आयटीआयची पदवी असणंही आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 24 असावे.
उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
ही निवड तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे. प्रत्येक युनिटमधील गुणवत्ता यादी त्या ट्रेडमधील मॅट्रिक + आयटीआयच्या गुणांमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल. ज्यात अप्रेंटिसशिप करायची आहे.
टीप: कृपया अधिकृत माहितीसाठी आणि अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.