नवी दिल्ली: अग्निपथ योजने (Agneepath Scheme) वरून देशात सुरु असलेल्या आंदोलनामध्ये आज रविवारी तिन्ही सेना मिळून एक पत्रकार परिषद (Press Conference Related To Agneepath Scheme) घेत आहेत. या दरम्यान युवकांनी उत्कटतेने आपले भान ठेवणे गरजेचं असल्याचं सेनेने म्हटले आहे. लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अरुण पुरी म्हणाले,’तीन सेवांमधून (अग्निपथ योजनेअंतर्गत भरती) दरवर्षी सुमारे 17,600 लोक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेत आहेत. निवृत्तीनंतर काय करणार हे त्यांना विचारण्याचा कधी कुणी प्रयत्न केला नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत या योजनेशी संबंधित जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आयएएफने (IAF) आपल्या प्लॅन नोटमध्ये अग्निपथला सशस्त्र दलांसाठी एक नवीन मानव संसाधन व्यवस्थापन योजना म्ह्णून वर्णन केलं आहे. त्यात त्यांनी असंही म्हटलं आहे की सैन्यात भरती झालेल्या उमेदवारांना हवाई दल कायदा 1950 द्वारे नियंत्रित केले जाईल.
सेवा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी अग्निवीरांनी स्वतःला कार्यमुक्त करण्याची केलेली विनंती मान्य केली जाणार नाही आणि केवळ अपवादात्मक प्रकारणांमध्येच परवानगी दिली जाईल आणि सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच ती पूर्ण होईल, असं त्यात म्हटलंय. हवाई दलाच्या २९ कलमी नोटमध्ये नव्या योजनेविषयी विविध माहिती देण्यात आलीये. त्यात पात्रतेचे निकष, मोबदल्याची पॅकेज, वैद्यकीय आणि सीएसडी (कँटीन स्टोअर विभाग) सुविधा, अपंगत्त्वाची भरपाई, अपंगत्त्वाच्या उंबरठ्याची मोजणी, रजा आणि प्रशिक्षण यांचा समावेश आहे. आता तिन्ही सैन्यांनी काय म्हटलंय जाणून घेऊया…
#WATCH | Ministry of Defence briefs the media on Agnipath recruitment scheme https://t.co/JRgzkQyuOn
— ANI (@ANI) June 19, 2022