मुंबई : थेट शिक्षण मंत्रालयात नोकरी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील भरती प्रक्रिया देखील सुरू आहे. मग अजिबात उशीर करून नका आणि करा थेट अर्ज. अर्ज करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अर्ज करा आणि तुमचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करा. विशेष म्हणजे थेट शिक्षण मंत्रालयात ही नोकरी असणार आहे. शिक्षण मंत्रालयाने या भरतीची अधिसूचना जारी केलीये. शिक्षण मंत्रालयात त्यानुसार तब्बल 39 पदे भरली जाणार आहेत. ही भरती विविध पदांसाठी होणार आहे. यामुळेच इच्छुकांनी आजच अर्ज करावा. भरतीचा अर्ज करणे देखील अत्यंत सोपे आहे.
या भरती प्रक्रियेत सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांचा देखील समावेश आहे. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता थेट भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की, 28 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 28 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीये.
या भरती प्रक्रियेत एसएसए प्रकल्पासाठी 26 सल्लागार, 7 वरिष्ठ सल्लागार, 4 मुख्य सल्लागार, 2 मुख्य सल्लागारांच्या पदांचा समावेश असणार आहे. यानुसार ही भरती प्रक्रिया पार पडेल. अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात ठेवा की, ही संपूर्ण भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीनेच होणार आहे. या पदांचा करारा कालावधी दोन वर्षांचा असेल.
दोन वर्षांनंतर पुढील निर्णयानंतर हा कालावधी पाच वर्षांचा देखील होऊ शकतो. मात्र, हे सर्वकाही दोन वर्षांनंतर स्पष्ट होईल. या पदांसाठी अर्ज करताना काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे सल्लागार पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे संबंधित विषयात मास्टर्स असणे आवश्यक आहे, त्याशिवाय ही निवड केली जाणार नाहीये.
फक्त मास्टर्सच नाही तर उमेदवाराला यासोबतच या कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. वरिष्ठ सल्लागाराच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे देखील पाच वर्षांचा अनुभव असायला हवा. जर तुम्ही मुख्य सल्लागार पदांसाठी अर्ज करत असाल तर लक्षात ठेवा की, या पदासाठी तुम्हाला दहा वर्षांचा अनुभव असायला हवा.
सल्लागार पदासाठी वय 35, वरिष्ठ सल्लागारासाठी 40, मुख्य सल्लागारासाठी 45, मुख्य सल्लागारासाठी 55 निश्चित करण्यात आले आहे. यानुसार पात्र ठरवले जाईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट edcilindia.co.in जाऊ शकता. या वेबसाइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. चला तर करा आजच अर्ज.