मुंबई महापालिकेत भरती प्रक्रियेला सुरूवात, चौथी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Dec 11, 2023 | 7:59 PM

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. थेट मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट मुंबई महानगरपालिकेत नोकरी तुम्ही करू शकता. ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

मुंबई महापालिकेत भरती प्रक्रियेला सुरूवात, चौथी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Follow us on

मुंबई : चौथी पास आहात आणि नोकरीच्या शोधात आहात? तर ही मोठी संधीच तुमच्यासाठी म्हणावी लागणार आहे. नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट मुंबईसारख्या मोठ्या शहरात. बृहन्मुंबई महानगरपालिकेत चौथी पास असणाऱ्यांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. होय तुम्ही खरे ऐकले. थेट चौथी पास असलेले उमेदवार मुंबई महानगरपालिकेत नोकरी करू शकतात. महापालिकेचा दवाखाना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करिता ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया पाच रिक्त पदांसाठी होत आहे. सफाई कामगार ही पदे या भरती प्रक्रियेमधून भरली जाणार आहेत. 11 डिसेंबर 2023 पासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. यापूर्वीच उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया एकून पाच जागांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण हे किमान चौथी पास असणे आवश्यक आहे. चौथी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहेत. ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पार पडणार आहे. वयाची अट देखील या भरती प्रक्रियेसाठी ठेवण्यात आलीये.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे कमीत कमी 22 ते जास्तीत जास्त 45 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ए विभाग, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई याठिकाणी पाठवावा लागणार आहे. यासोबत काही कागदपत्रे देखील उमेदवारांना पाठवावी लागतील.

परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. तुमचे अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर त्या अगोदरच पोहचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी वेळ अजिबातच वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावे. ही मोठी संधीच आहे, जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी.