मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आलीये. मग काय आजच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी आपल्या हक्काची. 23 नोव्हेंबर 2023 पासून ते 22 डिसेंबरपर्यंत आपण यासाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे तब्बल 91 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. मग उशीर कशासाठी आजच करा अर्ज. विशेष म्हणजे बारावी पास असलेले उमेदवार हा भरतीसाठी पात्र असणार आहेत. ही खरोखरच बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे.
कारागृह आणि सुधार सेवा विभागासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. हिमाचल प्रदेश जेल वॉर्डरच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भातील जाहिरात नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी आजच अधिकृत वेबसाइट hpprisons.nic.in ला भेट देऊन अर्ज करावा.
अधिसूचनेनुसार या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 91 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवाराने अगोदर जाहिरात सविस्तरपणे वाचावी आणि संबंधित आपण पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फार जास्त शुल्क देखील आकारण्यात नाही आले. अर्ज करण्यासाठी 200 रूपये फिस भरावी लागणार आहे.
जेल वॉर्डर पदांसाठी जर तुम्ही अर्ज करत आहात तर तुम्हाला बारावी पास असणे अनिवार्य आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी पास असायला हवी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक आहे. या गोष्टींना तुम्ही जर पात्र असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता.
जेल वॉर्डर पदासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक उमेदवारच लेखी परीक्षेसाठी पात्र नसणार आहे. उमेदवाराची अगोदर शारीरिक चाचणी ही घेतली जाईल. मग त्यानंतरच त्या संबंधित उमेदवाराला लेखी परीक्षेसाठी पात्र ठरवले जाईल. शारीरिक चाचणीचा नमुना विभागाकडून जारी लवकरच केला जाईल. या पदांसाठी तयारी करण्यासाठी उमेदवारांकडे बराच वेळ आहे. कारण अजून परीक्षेची तारीख जाहिर करण्यात नाही आली.