आयएएफ ग्रुप सी रिक्रुटमेंट 2022: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी भारतीय हवाई दलाकडून (Indian Air Frorce) एक आनंदाची बातमी आहे. हवाई दलाने हवाई दलाच्या अभिलेख कार्यालयात ग्रुप सी नागरी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी बारावी पास (12th Pass Candidates) उमेदवार ऑफलाइन अर्ज (Offline Application) करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. या भरतीविषयी सविस्तर जाणून घेऊयात.या पदांसाठी मान्यताप्राप्त बोर्डातील 12 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. संगणकाचेही ज्ञान असले पाहिजे. सर्व पदांसाठी 18 ते 25 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नोटिफिकेशनमध्ये याबाबत अधिक माहिती मिळेल.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे हवाईदल उमेदवारांची छाननी करणार आहे. या यादीत स्थान मिळवणाऱ्यांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर पाठवण्यात येणार आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालेल्यांना डॉक्युमेंट वेरिफिकेशन केल्यानंतर नोकरी मिळेल.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या भरतीची नोटिफिकेशन आणि अर्ज खरेदी करावा लागणार आहे. यानंतर त्यांना फॉर्म भरून संबंधित पत्त्यावर त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोकॉपीसह पाठवावे लागणार आहे. या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळेल.
Presiding Officer, Civilian Recruitment Board, Air Force Record Office, Subroto Park, New Delhi- 110010