नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेतून प्रशासकीय अधिकारी (स्केल-I) ची पदे भरली जाणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) कडून ही भरती सुरू आहे.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये नोकरी करण्याती सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून 200 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. आजपासूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये.
15 ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 नोव्हेंबर 2024 निश्चित करण्यात आलीये. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये.
तांत्रिक पदवी, चार्टर्ड अकाउंटन्सी, कायद्याची पदवी आणि इतर काही पदवी असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 21 ते 30 वयोगटाचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे.
प्रशासकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 50 हजार 925 रुपये ते 96 हजार 765 रुपये पगार दिला जाणार आहे. 250 रुपये फीस उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेचच अर्ज करावीत. ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल.