UPSC EPFO Exam 2021: यूपीएससीतर्फे ईपीएफओच्या 421 पदांसाठी 5 सप्टेंबरला परीक्षा, प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं?

| Updated on: Aug 31, 2021 | 10:56 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रवर्तन अधिकारी आणि लेखा अधिकारी भरती पक्रिया जानेवारी 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती. देशातील कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

UPSC EPFO Exam 2021: यूपीएससीतर्फे ईपीएफओच्या 421 पदांसाठी 5 सप्टेंबरला परीक्षा, प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं?
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) प्रवर्तन अधिकारी / लेखा अधिकारी परीक्षा 2021 चे आयोजन 5 सप्टेंबरला केलं जाणार आहे. या परीक्षेची प्रवेशपत्र यापूर्वीच जारी करण्यात आली आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असेल ते यूपीएससीची वेबसाईट upsc.gov.in वरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. एकूण 421 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना प्रवर्तन अधिकारी / लेखा अधिकारी (ईओ / एओ) भरती पक्रिया जानेवारी 2020 मध्ये सुरु करण्यात आली होती. देशातील कोरोना विषाणू संसर्गामुळे परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता परीक्षा 5 सप्टेंबरला होणार आहे. 9 ऑगस्टला यूपीएससीनं अ‌ॅडमिट कार्ड जारी केली आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड कसं करायचं?

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर भेट द्या
वेबसाईटवरील होमपेज Examination Notifications विभागात जा
यानंतर Admit Cards वर क्लिक करा
पुढे Enforcement Officer / Accounts Officer, E.P.F.O. 2020 वर भेट द्या
लॉगिन डिटेल्स सबमिट केल्यानंतर अ‌ॅडमिट कार्ड ओपन होईल.

पदांचा तपशील

यूपीएससीतर्फे ईपीएफओ प्रवर्तन अधिकारी आणि लेखा अधिकारी या पदाच्या 421 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गासाठी 168, ओबीसी प्रवर्गासाठी 116, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 42, एसटी प्रवर्गासाठी 33 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होईल. पात्र विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना इपीएफओ आणि श्रम आणि रोजगार मंत्रालयात प्रवर्तन अधिकारी किंवा लेखा अधिकारी म्हणून नियुक्त केले जाईल. लेखी परीक्षेतील गुणांना 75 टक्के तर मुलाखतीमधील गुणांना 25 टक्के भारांश असेल.

SSC जीडी कॉनस्टेबल भरती साठी अर्ज करण्याची शेवटची संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने CAPF मधील कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी किंवा जीडी), SSF आणि आसाम रायफल्स मध्ये रायफलमन या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. एसएससीनं जीडी कॉन्स्टेबल भरतीसाठी नोटिफिकेशन 17 जुलै रोजी जारी केलं होतं. एकूण 25 हजार पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशननं यावेळी 25271 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी 22424 जागा आहेत तर, महिला सांठी 2847 पद आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 ही आहे. तर, अर्जाचं शुल्क ऑनलाईन जमा करण्याची अखेरची मुदत 2 सप्टेंबर तर चलनाद्वारे सादर करण्याची अखेरची मुदत 7 सप्टेंबरपर्यंत आहे.

इतर बातम्या:

SBI Recruitment 2021 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी, आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अहमदनगर येथील सैन्यभरतीसंदर्भात महत्वाची अपडेट; सप्टेंबरमधील भरती लांबणीवर, नेमकं कारण काय?

UPSC EPFO Exam 2021 to be held on September 5 Know how to download Admit card