स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्यांनी ही बातमी लक्षपूर्वक वाचा. देशातील IAS आणि IPS अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याची बातमी समोर आली आहे. IPS मधील 586 रिक्त जागांपैकी 209 जागा सरळ भरतीसाठी आणि 377 पदे पदोन्नतीपदांसाठी आहेत. IFS च्या 1042 रिक्त पदांपैकी 503 थेट भरती आणि 539 पदोन्नती पदे आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी अंतर्गत भरण्यात येणारी IAS, IPS ची पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. सिंह म्हणाले की, मंजूर 5,055 पदांच्या तुलनेत 4,469 आयपीएस अधिकारी कार्यरत आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) आणि भारतीय पोलिस सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांची अनुक्रमे 1,316 आणि 586 पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. 1 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 6,858 IAS पदांपैकी 5,542 अधिकारी कार्यरत होते, अशी माहिती सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
1,316 IAS रिक्त जागांपैकी 794 थेट भरतीसाठी आणि 522 पदोन्नतीसाठी आहेत. IPS मधील 586 रिक्त जागांपैकी 209 जागा सरळ भरतीसाठी आणि 377 पदे पदोन्नतीपदांसाठी आहेत. सिंह म्हणाले की, भारतीय वन सेवेत (IFS) 3,193 मंजूर पदांच्या तुलनेत 2,151 अधिकारी आहेत. IFS च्या 1042 रिक्त पदांपैकी 503 थेट भरती आणि 539 पदोन्नती पदे आहेत.
IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांची निवड केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे केली जाते. आपल्या सविस्तर उत्तरात त्यांनी गेल्या पाच वर्षांत सामान्य, अनुसूचित जाती (SP), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) ते आयएएस, आयपीएस आणि आयएफएस पर्यंत झालेल्या नियुक्त्यांचा तपशील देखील सांगितला.
2022 मध्ये कोणत्या प्रवर्गातील किती अधिकारी झाले वर्ष 2022 च्या नागरी सेवा परीक्षेत (CSE) सामान्य प्रवर्गातून IAS मध्ये 75, OBC प्रवर्गातून 45, अनुसूचित जाती प्रवर्गातून 29 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून 13 नियुक्त्या करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे IPS मध्ये 83 जनरल, 53 OBC, 31 SC आणि 13 ST नियुक्त्या याच कालावधीत करण्यात आल्या. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, CSE 2024 दरम्यान आयएफएसमध्ये एकूण 43 सामान्य, 51 OBC, 22 SP आणि 11 ST नियुक्त्या करण्यात आल्या.