Engineering Jobs : रोजगार कधी म्हणत नाही ‘मी पुन्हा येईन’ ! संधी सोडू नका, नोकरी पुण्यात आहे…

| Updated on: May 18, 2022 | 12:38 PM

स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे. अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुकांनी भारती विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी. फोन नंबरवरही संपर्क साधता येईल.

Engineering Jobs : रोजगार कधी म्हणत नाही मी पुन्हा येईन ! संधी सोडू नका, नोकरी पुण्यात आहे...
भारती विद्यापीठात भरती प्रक्रिया
Image Credit source: Official Website Of BVP
Follow us on

पुणे : भारती विद्यापीठात (Bharti Vidyapeeth) स्थापत्य अभियंता (Civil Engineer), प्रकल्प अभियंता (Project Engineer), MEP अभियंता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. डिप्लोमा बी.ई सिव्हिल, यांत्रिक अभियांत्रिकी पदवी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी 20 मे 2022 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे. अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुकांनी भारती विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी. फोन नंबरवरही संपर्क साधता येईल. मुलाखत शुक्रवार दिनांक 20/05/2022 रोजी सकाळी 10.30 नंतर घेतली जाईल.

पदांचे नाव

  • स्थापत्य अभियंता
  • प्रकल्प अभियंता
  • MEP अभियंता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता

  1. स्थापत्य अभियंता – 1) डिप्लोमा / बी.ई सिव्हिल 2) 04 ते 05 वर्षे अनुभव – संस्थात्मक इमारतींच्या मोठ्या बांधकामाचा 4-5 वर्षांचा अनुभव. उमेदवाराने साइटच्या पर्यवेक्षणाचे ज्ञान ठेवले पाहिजे. गुणवत्ता तपासणी, बिलांची तपासणी, एस्टिमेट तयार करणे, ऑटोकॅड चालविण्यासाठी चांगलं ज्ञान असणं त्याचबरोबर, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल इ. ज्ञान असणं आवश्यक.
  2. हे सुद्धा वाचा
  3. प्रकल्प अभियंता – 1) डिप्लोमा / बी.ई सिव्हिल 2) 07 ते 10 वर्षे अनुभव – 7-10 वर्षांचा अनुभव,  बिलांची तपासणी, बिले तयार करणे, दर विश्लेषण, अंदाज, ऑटोकॅड ऑपरेट करण्यासाठी चांगली कमांड असणे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल इ.
  4. MEP अभियंता – 1) यांत्रिक अभियांत्रिकी पदवी 2) 07 ते 10 वर्षे अनुभव – संस्थात्मक आणि हॉस्पिटल बिल्डिंगच्या एचव्हीएसी/फायर/प्लिम्बिंग कामांमध्ये 7-10 वर्षांचा अनुभव. उमेदवाराकडे साइट्सच्या पर्यवेक्षणाचे ज्ञान असले पाहिजे. गुणवत्ता तपासणी, बिलांची तपासणी, एस्टिमेट तयार करणे, ऑटोकॅड चालविण्यासाठी ज्ञान असले पाहिजे, मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल इ.

महत्त्वाचे

  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचं ठिकाण –  Bharti Vidyapeeth, Bharti Vidyapeeth Bhavan, 4th floor, LBS Road, Pune-30
  • जाहिरात – Click Here
  • अधिकृत वेबसाईट – Click Here
  • Phone Number – 020 24407100, 24407302

इतर माहिती

शुल्क – शुल्क नाही.

वेतनमान – नियमानुसार

नोकरीचं ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

  • उमेदवारांनी 20 मे 2022 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
  • स्व-साक्षांकित केलेली कागदपत्रे मुलाखतीच्या वेळेला सादर करणे आवश्यक आहे.
  • मुलाखत शुक्रवार दिनांक 20/05/2022 रोजी सकाळी 10.30 नंतर घेतली जाईल.

( अधिकृत माहितीसाठी इच्छुकांनी भारती विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी )