पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) अंतर्गत भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. एकूण 3612 जागांसाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online Application)आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणारे उमेदवार 27 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी विना परीक्षा सिलेक्शन होणार आहे. इच्छुक उमेदवार 50% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या 10वी आणि ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर विविध ठिकाणी नियुक्ती मिळेल. अप्रेंटिसशिप 1 वर्षाची असेल आणि यादरम्यान उमेदवारांना निश्चित स्टायपेंड दिला जाईल. फिटर,वेल्डर,कारपेंटर ,पेंटर,डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक (मोटार व्हेईकल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,वायरमन, Reff. & AC मेकॅनिक,पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), PASAA, स्टेनोग्राफर, मशीनिस्ट, टर्नर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. वयाची अट, शैक्षणिक पात्रता याबद्दलची सविस्तर माहिती आणि अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
एकूण पदसंख्या : 3612
27 जून 2022 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
टीप: कृपया अधिक आणि अधिकृत माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला rrc-wr.com भेट द्यावी