अग्निवीरांसाठी (Agniveer) असलेल्या अटी आणि सुविधांची यादी भारतीय लष्कराने रविवारी जाहीर केली. अग्निवीरांना लष्कराच्या जवानांइतकाच कष्ट भत्ता (Hardship Allowance) मिळेल असे लष्कराने म्हटले आहे. याशिवाय अग्निवीरांना प्रवास आणि पेहराव भत्ताही (Travel And Dress Allowance) मिळणार आहे. अग्निवीर लष्करासोबत जेवण करतील आणि कामंही करतील, असं लष्करानं म्हटलं आहे. पण लष्कर आणि अग्निवीरांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांची ओळख आणि सेवाशर्ती यात काय फरक असेल जाणून घेऊयात
लष्करात भरती होणाऱ्या सैनिकाबरोबर फायदा असा की, केंद्र सरकारच्या धोरणांनुसार त्याला वर्षातून दोनदा डीए वाढीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर अग्निवीरचा पगार किमान एका वर्षासाठी निश्चित केला जातो.
अग्निवीरांची नोकरी ४ वर्षांसाठी असेल, पण लष्कराचे जवान किमान १५ वर्षे काम करतात तरच त्यांना पेन्शन आणि निवृत्तीच्या सुविधा मिळण्याचा हक्क आहे.
लष्कराच्या जवानांना 15 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. तर अग्निवीरांना 4 वर्षानंतर पेन्शन-ग्रॅच्युइटीसारखा कोणताही लाभ मिळणार नाही. होय, अग्निवीरांना 4 वर्षांच्या सेवा कालावधीत कपात करण्याचा निधी एकरकमी रक्कम म्हणून नक्कीच मिळेल. ही रक्कम 10.04 लाख असेल. यावर व्याज जोडल्यानंतर ही रक्कम 11.71 लाख रुपये होईल, जी अग्निवीरांना सेवानिधी पॅकेज म्हणून मिळणार आहे. ही रक्कम आयकरमुक्त असेल.
अग्निवीरांना वर्षभरात 30 सुट्ट्या दिल्या जातील, असे सरकारने जाहीर केले आहे. आणि त्यांना गरजेनुसार वैद्यकीय रजा दिली जाईल. लष्कराच्या नियमित सेवेत सेवा बजावणाऱ्यांना वर्षाला 90 सुट्ट्या मिळतात.
अग्निवीरांना एक वेगळी ओळख मिळेल, असं लष्करानं म्हटलं आहे. ‘अग्निवीर’ त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या गणवेशावर “विशिष्ट चिन्ह” परिधान करेल. याबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. म्हणजे अग्निवीरांचा बिल्ला लष्कर, नौदल, हवाईदल यांपेक्षा वेगळा असेल. हवाई दलात अग्निवीर स्वतंत्र रँक तयार करेल, जे इतर कोणत्याही विद्यमान रँकपेक्षा वेगळे असेल, असे आयएएफने म्हटले आहे. अग्निवीर त्याच्या सेवेदरम्यान त्याच्या गणवेशावर एक विशिष्ट चिन्ह परिधान करेल.