2030 पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब (Global Drone Hub)बनवण्याचं लक्ष्य आहे. औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी सरकारचे (Government) प्रयत्न सुरु आहेत असं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी ड्रोन पायलट्सच्या (Drone Pilots) भरतीची देखील घोषणा केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्लीत निती आयोगाच्या Experience Studio च लॉन्चिंग केलं त्यावेळी त्यांनी या भरतीची घोषणा केली.
पुढील काही वर्षांत देशात जवळपास 1 लाखाहून अधिक ड्रोन पायलट्सची भरती करणार असल्याचं नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलंय. या नोकरीसाठी कॉलेजच्या पदवीची आवश्यकता नाही. केंद्राकडून देशभरात ड्रोन सेवेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात ड्रोन पायलट्सची बंपर भरती होण्याची शक्यता आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या पीएलआय (उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन) योजनेमुळे ड्रोन क्षेत्रातील उत्पादन आणि सेवांना नव्याने चालना मिळणार आहे,’ असेही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
Got a chance to meet & interact with the young &energetic drone community at the launch of @NITIAayog‘s Experience Studio on Drones.Under the leadership of PM Sh @narendramodi ji & the dynamism of our youth,India will rise rapidly to become a global drone hub by 2030.@amitabhk87 pic.twitter.com/jFlhY8wQ1b
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) May 10, 2022
“दोन-तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासह, ही व्यक्ती ड्रोन पायलट म्हणून नोकरीमध्ये येऊ शकते, ज्याचा मासिक पगार सुमारे 30,000 रुपये आहे,” ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. “येत्या काही वर्षांत आम्हाला जवळपास एक लाख ड्रोन वैमानिकांची गरज आहे. त्यामुळे ही संधी जबरदस्त आहे,’ असेही ते म्हणाले.
2026 पर्यंत भारतीय ड्रोन उद्योगात 15,000 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होईल असं वक्तव्य गेल्या वर्षी ज्योतिरादित्य शिंदेंनी केलं होतं.