बंगळुरु : बांगलादेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन मारहाण करत, या कृत्याचे व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी बारा नराधमांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच आठवड्यांच्या कालावधीत कोर्टात 1,019 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये 11 अवैध बांगलादेशी स्थलांतरितांचा समावेश आहे. बांगलादेशी तरुणीवरील गँगरेपचा मुद्दा सोशल मीडियावर संतापाचा विषय ठरत होता. (11 Bangladeshi Immigrants Arrested for Gang rape of Woman in Bengaluru)
काय आहे प्रकरण?
आसाम पोलिसांनी व्हायरल व्हिडीओतून आरोपींचे फोटो जारी करत सुरुवातीला बंगळुरुतून पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर पाच आठवड्यांच्या कालावधीत तपास पूर्ण करत कोर्टात 1,019 पानी आरोपपत्र दाखल केल्याची माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी दिली आहे. आरोपींना पकडणाऱ्या आणि केसचा तपास करणाऱ्या पथकातील सदस्यांना एक लाखांचं बक्षीस दिलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
An update on the Bangladeshi woman abuse case:
Twelve accused are arrested, out of which 11 accused persons & the victim are Bangladeshi nationals. The investigation is complete and a detailed & systemic 1019 page charge sheet has been submitted to the Hon’ble Court.. (1/3)
— Kamal Pant, IPS (@CPBlr) July 8, 2021
पीडिता आणि आरोपी बांगलादेशी
पीडिता आणि आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं तपासादरम्यान समोर आलं आहे. सर्व जण एकाच ग्रुपचे सदस्य होते. मात्र पैशांच्या कारणावरुन भांडणं झाली. त्यानंतर आरोपींनी महिलेचे शारीरिक शोषण केले. मानवी तस्करीसाठी पीडित महिलेला बांगलादेशहून भारतात आणल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन चित्रीकरण, व्हायरल व्हिडीओवरुन महिलेसह पाच जणांना बेड्या
39 वर्षीय आरोपीचा महिलेवर बलात्कार, 17 वर्षीय तरुणाकडून व्हिडीओ शूट, धमकावत लैंगिक अत्याचार
(11 Bangladeshi Immigrants Arrested for Gang rape of Woman in Bengaluru)