ब्राझीलिया : मुलगा चांगला की मुलगी चांगली असं जनरली हेल्थी कम्युनिकेशन जेव्हा होतं तेव्हा पालक नेहमीच मुलीची जास्त निवड करतात. अर्थात मुलगा-मुलगी एकसमान. पण पालकांच्या मनात मुलींच्याबाबत एक नेहमीच सॉफ्ट कॉर्नर असतो. कारण आपण ज्या मुलीला लहानाचं मोठं करतो, जीव लावतो, तिला एकेदिवशी उंबरठा ओलांडून सासरी जावं लागतं. या गोष्टीचा पालकांना त्रास होतोच. याशिवाय मुली मुलांपेक्षा जास्त जीव लावतात, असं आपण नेहमी म्हणतो. विशेष म्हणजे मुलगी आणि वडील यांच्यातील प्रेम हे जगात भारी असतं. पण ब्राझीलमधल्या एका घटनेने संपूर्ण जगातील प्रसारमाध्यामांचं लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण घटनाच तितकी भयानक आहे. एका 12 वर्षीय मुलीने आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. विशेष म्हणजे या हत्येमागील कारण इतकं विचित्र आहे की ते समजल्यानंतर अनेकजण चक्रावून गेले आहेत.
संबंधित घटना ही ब्राझीलच्या सँटा कॅटरीना येथे घडली आहे. आरोपी मुलगी अल्पवयीन असल्याने तिचं नाव आम्ही सांगू शकत नाहीत. पण तिने हत्या केलेल्या वडिलांचं नीफ लुईस वरलंग असं नाव आहे. विशेष म्हणजे ते पोलिसात अधिकारी होते. त्यांच्या हत्येमागील कारण हे फारच विचित्र आहे. त्यांच्या मुलीने आपल्याला प्रसिद्धी मिळावी या हेतूसाठी आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली. विशेष म्हणजे तिला या कृत्यात तिच्या शाळेतील एका मैत्रिणीने मदत केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.
वडिलांची हत्या करणारी अल्पवयीन मुलगी ही एका 2002 साली घडलेल्या हत्या प्रकरणातून प्रभावित झाली होती. ब्राझीलमध्ये सुझेन लुईस नावाच्या एका मुलीने 20 वर्षांआधी आपल्या आई-वडिलांची हत्या केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी ती शाळेत शिकत होती. तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची हत्या केली होती. याच घटनेतून 12 वर्षीय मुलगी प्रभावित झाली होती. तिने पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांनी वडिलांची हत्या करणाऱ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे त्यांना आपण केलेल्या गुन्ह्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. आपण चुकीचं केलेलं नाही, अशा अविर्भावात ते आहेत. खरंतर त्यांचं वय खरंच खूप कमी आहे. ते लहान आहेत. त्यांना चांगलं-वाईट काही ठावूक नाही. पण त्यांनी इतकं वाईट कृत्य केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांनी दोन्ही मुलींना बालसुधारणगृहात टाकलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं